ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

होय, मी भाजपला मदत केली!:एकनाथ खडसेंची मुक्ताईनगरच्या निकालावर जाहीर कबुली, गुलाबराव पाटलांवरही जोरदार पलटवार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जळगाव जिल्ह्याचे राजकारण नेहमीच चर्चेत असते, मात्र यावेळी निमित्त ठरले आहे ते मंत्री गुलाबराव पाटील आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यातील वाकयुद्ध. गुलाबराव पाटील यांनी नाथाभाऊंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खडसेंनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचे नेते असूनही त्यांनी भाजपला मदत केल्याचा आरोप पाटलांनी केला होता. त्यावर नाथाभाऊंनी ‘खरं बोलायला काय हरकत आहे? होय, मी भाजपला मदत केली’ असे म्हणत स्थानिक गणिते वेगळी असल्याचे स्पष्ट केले. गुलाबराव पाटील यांनी एका सभेत दावा केला होता की, “नाथाभाऊंनी मला खूप त्रास दिला, त्याचीच फळं ते आता भोगत आहेत.” यावर पलटवार करताना खडसे म्हणाले, “मी जिल्ह्यात अनेकांना त्रास दिला हे खरं आहे, पण तो त्रास केवळ भ्रष्ट प्रवृत्तीच्या लोकांना आणि गुंडांना दिला आहे. अशा लोकांना जेलमध्ये टाकण्याचे काम मी केले आहे आणि पुढेही करत राहीन. गुलाबराव पाटील विसरले असावेत की त्यांच्या आमदारकीच्या काळात मी त्यांना मोठी मदत केली होती. ते अजून राजकीयदृष्ट्या खूप लहान आहेत.” एकनाथ खडसेंची ‘धक्कादायक’ कबुली मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली होती. यावेळी राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असूनही खडसेंनी भाजपचा छुपा प्रचार केल्याची चर्चा होती. गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा लावून धरला असता, खडसे यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. “गुलाबराव एवढी वर्षे मंत्री आहेत, पण ते आपल्या गावची नगरपरिषद निवडून आणू शकले नाहीत, त्यांनी आधी आत्मचिंतन करावे. आणि हो, मी मुक्ताईनगरमध्ये भाजपला मदत केली, हे सत्य स्वीकारायला मला कोणतीही अडचण नाही,” असे खडसे म्हणाले. वरणगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाला खिंडार एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यातील हा वाद सुरू असतानाच, गुलाबराव पाटलांनी खडसेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा धक्का दिला आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. वरणगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले राजेंद्र चौधरी यांचा पराभव झाला होता. त्यांना शिंदे गटाने स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने, त्यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादीला रामराम ठोकला. वरणगाव परिसरात खडसेंची मोठी पकड मानली जाते, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पक्षप्रवेशामुळे खडसेंसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर