ब्रेकिंग न्यूज
लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक IND vs WI : भारताविरुद्ध वेस्ट इंडिजची टीम जाहीर! 3 खुंखार खेळाडू घालणार तांडव; 30 वर्षाच्या वादळी खेळाडूचा… घराला एकच दरवाजा, कामे आटोपून झोपली महिला, शेजाऱ्यानं मध्यरात्री पाहिलं, तर…, सांगली हादरलं! गांडूळ खत निर्मितीचा व्यवसाय केला यशस्वी, आता वर्षाला होतीये 7 लाख रुपयांची उलाढाल, सांगितला यशाचा मंत्र नागपुरात सर्वात लांब उड्डाणपूल, CM फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन, पुलाची वैशिष्ट्ये काय? VIDEO
SP News Maregaon

‘अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व’!:मशाल गायब, उद्धव ठाकरेंचाही फोटो नाही; बंडू जाधवांच्या पोस्टमधून स्पष्ट झाले नवे राजकीय संकेत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60 व्या वर्धापनदिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये शिवसेना (उबाठा)चे निवडणूक चिन्ह असलेली ‘मशाल’ गायब आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही फोटो दिसत नाही. त्याऐवजी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आणि “अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व… 60 वर्ष हिंदुत्वाशी वचनबद्धता” असा संदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कट्टर समर्थक मानले जाणारे बंडू जाधव आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाच्या भूमिकेशी उघडपणे जवळीक साधत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. परभणीचा ‘राजकीय शाप’ पुन्हा चर्चेत; खासदारकीच्या काळात पक्ष सोडणारे 5वे नेते! बंडू जाधव यांच्या निर्णयानंतर परभणी लोकसभा मतदारसंघाचा एक जुना राजकीय इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे. परभणीला अनेक वर्षांपासून ‘शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला’ म्हणून ओळखले जाते. मात्र, या बालेकिल्ल्याचा इतिहास पाहिला तर खासदारकीच्या कार्यकाळातच पक्षाशी बंड करणाऱ्या नेत्यांची एक वेगळी परंपरा दिसून येते. राजकीय निरीक्षकांच्या मते, बंडू जाधव यांचे नाव आता अशाच नेत्यांच्या यादीत समाविष्ट झाले आहे. पूर्वी कोणकोणत्या नेत्यांनी पक्षाशी बंड केले होते? अशोक देशमुख यांनी 1989 आणि 1991 च्या काळात पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन तत्कालीन काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला होता. अविश्वास प्रस्तावावेळी पक्षादेश न पाळल्याने त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर सुरेश जाधव, तुकाराम रेंगे आणि गणेशराव दुधगावकर यांनीही विविध कारणांमुळे शिवसेनेपासून फारकत घेतली होती. आता या यादीत संजय जाधव यांचे नाव पाचवे म्हणून जोडले जात असल्याची चर्चा आहे. मात्र, यातील बहुतेक नेत्यांनी तिकीट नाकारल्यानंतर बंडखोरी केली होती. संजय जाधव यांचे प्रकरण त्यापेक्षा वेगळे मानले जात आहे, कारण ते विद्यमान खासदार असतानाच त्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. नेमकी नाराजी कशामुळे? सूत्रांच्या माहितीनुसार, संजय जाधव गेल्या काही महिन्यांपासून पक्ष नेतृत्वावर नाराज होते. परभणी महापालिकेत आणि जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करूनही पक्षाकडून अपेक्षित पाठबळ मिळत नसल्याची भावना त्यांच्यामध्ये होती. विकासकामांबाबत येणारे अडथळे, निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब आणि नेतृत्वाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्येही होती. त्यांच्या समर्थकांमध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जात होता: “पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करूनही जर साधे कौतुक किंवा पाठबळ मिळत नसेल, तर पुढे कसे जायचे?” अशी खदखद बऱ्याच काळापासून असल्याचे सांगितले जाते. निकटवर्तीयांना आधीच लागला होता सुगावा संजय जाधव यांच्या बदलत्या भूमिकेची चाहूल त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांना आधीच लागली होती. गेल्या काही दिवसांत त्यांनी पक्षाच्या काही महत्त्वाच्या बैठका टाळल्या होत्या. त्यामुळे ते मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती. दुसरीकडे, उद्धव ठाकरे गटानेही परिस्थितीचा अंदाज घेत परभणी जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी सुरू केली. काही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या आणि संघटनात्मक बदल करून पक्षाने अप्रत्यक्षपणे पर्यायी नेतृत्व तयार करण्याची तयारी सुरू केल्याचे मानले जात होते. ऑपरेशन टायगरमध्ये सहा खासदारांचा सहभाग गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’अंतर्गत ठाकरे गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गटाची भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. यामध्ये संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांनी लोकसभा अध्यक्षांकडे स्वतंत्र गटाबाबत पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे. पुढे ते अधिकृतपणे शिंदे गटात विलीन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धापनदिनाच्या दिवशी पोस्टमधूनच दिला संदेश आज शिवसेनेचा 60वा वर्धापनदिन आहे. अशा दिवशी बंडू जाधव यांनी केलेली पोस्ट केवळ शुभेच्छा देणारी नसून ती त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीचा संकेत असल्याचे मानले जात आहे. मशाल गायब, उद्धव ठाकरेंचा फोटो नाही, फक्त बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्वाचा स्पष्ट उल्लेख — या सर्व गोष्टी एकत्र पाहिल्यास बंडू जाधव यांनी आपली राजकीय दिशा जवळपास स्पष्ट केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटाच्या मेळाव्यात किंवा पुढील काही दिवसांत बंडू जाधव स्वतः कोणती भूमिका जाहीर करतात, याकडे परभणीसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर