ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

स्थानिक गुन्हे शाखा पथक वणी व मारेगाव पोलिसांची धडक कारवाई

132 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सराटी येथे अवैध दारू साठा जप्त

गजानन आसुटकर मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील सराटी येथे अवैध दारू साठा व दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा वणी व पोलीस स्टेशन मारेगाव च्या वतीने आज दिनांक 14 डिसेंबर 2023 रोज गुरुवारला सकाळी 7 वाजुन 10 मिनिटांनी धाड टाकून सदर कार्यवाही करण्यात आली.

सराटी येथील संशयित विवेक नरांजे वय सुमारे 39 वर्ष हे अवैध दारू विक्री करीत असल्याबाबतची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा वणी व मारेगाव पोलीस स्टेशनला मिळाली त्या आधारे सदर धाड टाकली व घर झळती घेतली असता 46 हजार 700 रूपये इतक्या किमतीचे 180 मिली क्षमतेच्या देशी दारूने भरलेल्या एकूण 672 बॉटल ज्याची किंमत 69 रुपये 50 पैसे असून एकूण 46,704 किमतीचा किमतीची देशी दारू अवैधरित्या रुपेश संत्रा घरी साठवणूक केल्याचे दिसून आले.

देशी दारूचे एकूण 14 बॉक्स मिळाली आहेत सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा वणी व पोलीस स्टेशन मारेगाव यांनी सदर कारवाई संयुक्तरित्या केली असून या कारवाईत संशयित विवेक नरहरी नरांजे राहणार सराटी वय 39 यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन मारेगाव येथे कलम 65 इ मदाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

असून या कारवाईत सहा.पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर स्थानिक गुन्हे शाखा वणी यांचे नेतृत्वात सुनील खंडागळे, सुधीर पांडे ,सुधीर पिदुरकर,रजनीकांत मडावी,सतीश फुके तसेच रजनीकांत पाटील पोलीस कॉन्स्टेबल मारेगाव राजू टेकाम असून सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन मारेगाव यांच्या कडून करण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर