ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

वसमत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार:राजदरी येथील एका तरुणावर कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वसमत तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीसोबत ओळख वाढवून तिच्यावर अत्याचार केल्याच्या आरोपावरून राजदरी (ता. वसमत) येथील एका तरुणावर कुरुंदा पोलिस ठाण्यास रविवारी ता. २९ गुन्हा दाखल झाला आहे. सदर मुलगी पाच महिन्याची गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून पोलिसांनी आरोपी तरुणाच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तालुक्यातील राजदरी येथील तरुण विजय कऱ्हाळे हा वसमत तालुक्यातील एका गावात त्यांच्या नातेवाईकांकडे आला होता. त्यावेळी त्या गावात काही दिवस राहिल्यानंतर त्याने एका अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिच्याशी बोलण्यास सुरवात केली. त्यानंतर त्याने मुलीशी प्रेमाच्या जाळ्यात ओढून शेतात जाऊन तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, विजय हा त्या मुलीस वारंवार भेटण्यासाठी येऊ लागला होता. यावेळी तो मुलीस प्रेमाचे नाटक करून तिच्यावर अत्याचार करू लागला. काही दिवसानंतर मुलीच्या पोटात दुखत होते शिवाय तिला अस्वस्थ वाटत असल्याने तिच्या कुटुंबियांनी तिला उपचारासाठी एका रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर सदर मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सदर मुलगी पाच महिन्याची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिच्याकडे विचारणा् केली असता तिने विजय याने प्रेमाचे नाटक करून अत्याचार केल्याचे सांगितले. या प्रकारानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलीस घेऊन थेट कुरुंदा पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी विजय कऱ्हाळे याच्या विरुध्द बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रामदास निरदोडे, उपनिरीक्षक गंधकवाड, कारामुंगे पुढील तपास करीत आहेत. पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर