ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

हिरव्या, भगव्या रंगाचा स्वार्थासाठी वापर:काँग्रेसचे मुंब्रा वादावर भाष्य; हिरवा सुबत्तेचा, भगवा त्यागाचा रंग म्हणत तिरंगा घरोघरी पोहोचवण्याचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


तिरंगा ही देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी आपल्या अनेक लोकांनी रक्त सांडले आहे. आज काही जातीयवादी व धर्मांध शक्ती स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. पण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यातील घराघरात मनामनात तिरंगा पोहोचवला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केले. 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते मुंबई स्थित राज्य काँग्रेसचे मुख्यालय असलेल्या टिळक भवनात ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, सरचिटमीस प्रफुल्ल गुडदे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा, प्रदेश सरचिटणीस जोजो थॉमस, झिशान अहमद, श्रुती म्हात्रे आदी नेते उपस्थित होते. एमआयएमच्या मुंब्रा येथील नगरसेविका सहर शेख यांनी संपूर्ण मुंब्रा हिरवा करण्याची घोषणा केली. त्यावर भाजपने आक्षेप घेत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांत राजकीय कलगीतुरा रंगला असताना हर्षवर्धन सपकाळ यांनी उपरोक्त आवाहन केले. तिरंगा एक विचार, एक स्वप्न हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, स्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. ही एक मोठी साधना आहे. या साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचे, धर्माचे राजकारण करत आहेत. कुणाला हिरव्या रंगाचे, तर कुणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदर आहेच. कारण, हिरवा रंग हा सुबत्तेचा, तर भगवा रंग हा त्यागाचे व सन्मानाचे प्रतिक आहे. तिरंगा हा एक विचार आहे. स्वप्न आहे. त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत. भाजप व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षासोबत जनसंघाने निवडणुका लढवल्या. त्यांच्यासोबत सरकार स्थापन केले. त्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होते. आज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहे, असे ते म्हणाले. मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवा तिरंगा हा आपल्या देशाची आन, बान व शान आहे. तिरंग्यासाठी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपले बलिदान दिले आहे. पण सध्या काही जातीयवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा निर्धार करावा, असेही सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर