ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

स्वच्छतागृहात बेकायदेशीर दारू ठेवण्यास विरोध करणाऱ्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला:हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात घटना, चौघांवर गुन्हा दाखल

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हिंगोली जिल्ह्यात आता बेकायदेशीर दारु लपविण्यासाठी दारु विक्रेते मिळेल ती जागा शोधू लागले असून सारंगवाडी येथे स्वच्छतागृहात दारु का ठेऊ दिली नाही या कारणावरून एका कुटुंबाला काठीने मारहाण झाल्याची घटना या प्रकरणी चौघांवर सोमवारी ता. 8 रात्री उशिरा औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी जिल्ह्यात अवैध व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम उघडली आहे. बेकायदेशीर दारू विक्री, गुटखा आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या पथकांकडून सातत्याने छापे टाकले जात आहेत. पोलिसांच्या या कडक कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून, ते आता ग्रामीण भागात मिळेल त्या ठिकाणी दारू लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. औेढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी येथे दारु विक्रेत्याने कारवाईच्या भिती पोटी गावातील सुभाष ठोंबरे यांच्या घराशेजारील स्वच्छतागृहात चौघाजणांनी बेकायदेशीर दारूचे बॉक्स ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी सुभाष यांनी त्यास विरोध केला. या ठिकाणी दारुचे बॉक्स ठेऊ नका असे त्यांनी सांगितले. याचा राग मनात धरून संदीप ठोंबरे, महादू ठोंबरे, भगवान ठोंबरे आणि वैभव ठोंबरे यांनी संगनमत करून सुभाष ठोंबरे यांना शिवीगाळ करत काठीने मारून जखमी केले. सदर भांडण सोडविण्यासाठी सुभाष यांचे वडील, आई व भाऊ मध्ये पडले असता, त्यांच्या डोक्यावर काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरण सुभाष यांनी दिलेल्या तक्रारीवरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड, जमादार दिलीप नाईक पुढील तपास करीत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर