ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

करणवाडी–खैरी रस्ता मोजतोय अखेरची घटका

4 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

नवीन रस्त्यावर दीड ते साडेतीन फुटांचे खड्डे; अपघातांना खुले आमंत्रण

सुरेश पाचभाई / मारेगाव

मारेगाव तालुक्यातील कुंभा ते खैरी (करणवाडी–खैरी) या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असताना अवघ्या काही दिवसांतच या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली आहे. रस्ता आहे की खड्ड्यांची माळ, असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत.

कुंभा व महादापेठ या दोन गावांदरम्यान असलेल्या पुलावर तर अक्षरशः दीड ते साडेतीन फुट खोल खड्डे पडले असून या मार्गावरून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे.ये-जा करणाऱ्या दुचाकी, चारचाकी व एसटी बससाठी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. एखादा क्षण चुकला तरी वाहन पलटी होण्याची किंवा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हा रस्ता शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार व प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र अशा धोकादायक परिस्थितीतून दररोज प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठी दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग, मारेगाव यांच्या अखत्यारीत येतो. इतक्या अल्पावधीत रस्ता पूर्णपणे उखडून खड्डेमय होणे, यामुळे कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई किंवा दुरुस्तीचे संकेत दिसून आलेले नाहीत.

परिसरातील नागरिक, पालक व वाहनधारकांनी तात्काळ रस्ता दुरुस्ती करून सुरक्षित वाहतूक सुरू करण्याची जोरदार मागणी केली आहे. जर एखादी अनुचित घटना घडली, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभाग व यंत्रणेवर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

प्रशासनाने वेळेत दखल घेतली नाही, तर नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता तरी सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार की एखाद्या दुर्घटनेची वाट पाहणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर