ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

निर्णयक्षमता गमावलेल्या आजच्या तरुण पिढीला भागवत ग्रंथ हाच मोठा आधार:ज्येष्ठ ब्रह्मचारी रेवतीनंदन दास यांचे निरुपण, श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा उत्साहात‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आजची तरुण पिढी अनेक बाबतीत संभ्रमात असून आपली निर्णयक्षमता गमावून बसली आहे. अशा भरकटलेल्या युवकांना दिशा दाखवण्यासाठी आणि जीवनात स्थैर्य आणण्यासाठी ‘श्रीमद् भागवत ग्रंथ’ हाच खरा मोठा आधार वाटतो, असे निरुपण ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास यांनी केले. येथील नवीन टिळक रोडवरील माऊली सांस्कृतिक भवनमध्ये आयोजित श्रीमद् भागवत कथा निरूपण सोहळ्याचे चतुर्थ पुष्प गुंफताना ते बोलत होते. या सोहळ्यात सर्वश्री वैष्णवतोष्णी दास, डॉ. सतीश फाटके, अशोक कानडे, मदन कांबळे, डॉ. अंजली फाटके, मगन पटेल, राजू पटेल, मदन थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या थाटात आणि पुष्पवृष्टी करत ‘श्रीकृष्ण जन्मोत्सव सोहळा’ साजरा करण्यात आला. सोहळ्यादरम्यान इस्कॉन मंदिराचे व्यवस्थापक श्रीमान गिरीवरधारी दास यांनी अहिल्यानगर शहरासह देशभरात आणि जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इस्कॉनच्या आंतरराष्ट्रीय कार्याची माहिती उपस्थितांना दिली. अध्यात्म आणि मानवी मूल्यांची जपणूक करण्यासाठी इस्कॉन सातत्याने कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कथेचे महत्त्व सांगताना श्रीमान रेवतीनंदन दास म्हणाले, अठरा पुराणे ऐकल्यावर जे पुण्य मिळते, ते एकट्या भागवत कथेच्या श्रवणाने प्राप्त होते. कलयुगावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की: कलीचा वास कुठे? मद्यपान, पशुहत्या-मांसाहार, व्यभिचार आणि जुगार या चार गोष्टींमध्ये कलयुगाचा वास असतो. भांडणे आणि दांभिकता ही कलीची मुख्य लक्षणे आहेत. जो मनुष्य नित्य-निरंतर कथा वाचन, श्रवण, पूजा आणि नामजप करतो, त्यावर कलयुगाचा कोणताही प्रभाव पडत नाही. भगवंताचे नाम आणि भगवंत यात काहीही अंतर नाही. पालकांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, जे आई-वडील आपल्या मुलांना भगवंताची भक्ती शिकवत नाहीत, ते कर्तव्य विसरतात. आज लेकरांना टीव्हीवर फक्त ‘कार्टून’ दाखवले तर ती पुढे कार्टूनच बनतील, त्यामुळे त्यांना सुसंस्कारांची गरज आहे. मुलगी साक्षात लक्ष्मी; ४२ पिढ्यांचा उद्धार आपण केलेल्या धर्मकार्याचा लाभ केवळ आपल्यालाच नाही, तर आपल्या पुढील पिढ्यांनाही होतो, असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा दाखला दिला. मुलगा भक्त झाला तर २१ पिढ्यांचा उद्धार करतो, पण मुलगी भक्त झाली तर ती साक्षात लक्ष्मीच्या रूपाने माहेर आणि सासर अशा ४२ पिढ्यांचा उद्धार करते, असे ज्येष्ठ ब्रह्मचारी श्रीमान रेवतीनंदन दास म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर