ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम:अजितदादांच्या विमानाने आकाशात घिरट्या घातल्या, जोरात खाली आले, जमिनीवर कोसळून प्रचंड स्फोट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला आज सकाळी बारामती विमानतळावर लँडिंग करताना भीषण अपघात झाला. विमान शेतात कोसळल्याने त्याला आग लागली आणि 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अजित पवार, त्यांचे सुरक्षारक्षक, पीए आणि वैमानिकांचा समावेश आहे. अजित पवार आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले आणि आग लागली. तातडीने बचावकार्य सुरू अपघाताची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघाताची बातमी समजताच राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि इतर राजकीय नेत्यांनी अपघातावर शोक व्यक्त केला आहे. अपघातस्थळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अग्निशमन दल आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. मात्र, अपघात इतका भीषण होता की, त्यातून कोणालाही वाचवण्याची संधीच मिळाली नाही. दुर्घटनेचा थरारक घटनाक्रम बारामती परिसरात आज सकाळी घडलेल्या विमान दुर्घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीतून धक्कादायक तपशील समोर येत आहेत. अनेक नागरिकांनी सांगितले की संबंधित विमान काही वेळ आकाशात घिरट्या घालत असल्याचे दिसत होते. लँडिंगच्या आधी विमानाचा वेग कमी झाला होता, मात्र अचानक ते जोरात खाली येताना दिसले. साधारण 100 फूट अंतरावर असताना विमान जमिनीवर आदळले आणि क्षणातच त्याला आग लागली, असे एका स्थानिक व्यक्तीने सांगितले. अपघात होताच मोठा आवाज झाला आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. एका महिलेने सांगितले की, आम्ही आवाज ऐकून त्या दिशेने धावलो, पण तोपर्यंत विमानाचा चक्काचूर झाला होता. दरम्यान, शेजारच्या शेतात काम करत असलेल्या एका महिलेनेही थरारक अनुभव कथन केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, विमान प्रथम वरून गेले, पुन्हा वळून आले आणि हळूहळू खाली येऊ लागले. प्रत्येक फेरीत ते अधिकच खाली येत असल्याचे दिसत होते. महिलेने सांगितले की विमान धावपट्टीच्या दिशेने झुकलेले दिसत असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर विमानाचे अनेक तुकडे हवेत उडाले आणि जळत्या अवस्थेत ते फिरताना दिसले. स्फोट इतका भीषण होता की आमच्या घराजवळही विमानाचे अवशेष पडले, असेही त्यांनी सांगितले. स्फोटानंतर घटनास्थळावर धुराचे मोठे लोट उठत होते आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. प्रत्यक्षदर्शींच्या या कथनामुळे अपघाताची तीव्रता आणि अचानकपणा स्पष्ट होत असून, संपूर्ण परिसर हादरून गेला असल्याचे चित्र दिसून येत आहे. असा आवाज या आधी कधीही आलेला नाही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विमान खाली येत असताना त्यातून खूप मोठ्या प्रमाणात आवाज येत होता. विमान या ठिकाणी नेहमीच लँड करते. मात्र असा आवाज कधीही आलेला नाही. अगदी जमिनीच्या जवळ आल्यानंतर विमान अचानक तिरपे झाले. आणि ते जवळच्या शेतामध्ये कोसळले. विमान कोसळल्यानंतर एका मागे एक असे तीन ते चार स्फोट झाले. अपघात एवढा भीषण होता की, प्रत्यक्षदर्शी जवळ जाईपर्यंत सर्व प्रवाशांचा जळून मृत्यू झाला होता. नेमका अपघात कुठे आणि कसा झाला? उपलब्ध माहितीनुसार, अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून खासगी विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. सकाळी सुमारे 8:40 ते 8:45 च्या दरम्यान बारामती विमानतळावर विमान लँडिंग करण्याचा प्रयत्न करत असताना अचानक वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटल्याचा दावा करण्यात येतो. तांत्रिक बिघाडामुळे विमान नियोजित धावपट्टीवर उतरण्याऐवजी विमानतळालगत असलेल्या एका शेतात जोरात आदळले, अशी माहिती पुढे आली आहे. विमान जमिनीवर आदळताच काही सेकंदांतच त्याला भीषण आग लागली. आगीचे लोळ उठू लागल्याने संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आणि जळून खाक झाले, असे सांगितले जाते. अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले, ज्यामुळे आसपासच्या गावांमध्ये आणि विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्कालीन सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याचे दावे करण्यात येत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर