ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

शिक्षण हेच यशाचे खरे साधन:त्याआधारेच ध्येय गाठणे शक्य, नगराध्यक्ष अविनाश गायगोलेंचे प्रतिपादन‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिक्षण हेच यशाचे खरे साधन आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने बाळगून सातत्य, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर वाटचाल केल्यास कोणतेही ध्येय गाठता येते, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अविनाश गायगोले यांनी केले. ओतारी समाज संघाच्या जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच पालकांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहन तराळे होते, तर जळगावचे माजी अध्यक्ष दीपक कंडारे, राजेश तायवाडे (मध्यप्रदेश), ओंकार राऊत, विनोदराव डोंगरे, ज्ञानेश्वर डोंगरकर, ज्योत्स्ना करवाडे, आशा सायगन, श्रीराम वऱ्हाडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या यशामागे पालकांचे मोलाचे योगदान असल्याचे नमूद करून गायगोले यांनी संबोधनात उपस्थित पालकांचे अभिनंदन केले. या वेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन केलेल्या २८ विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. भारतीय सैन्य दलात अग्निवीर म्हणून निवड झालेल्या ओम पटवी यांच्या आई-वडिलांचाही विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण करणारा हा उपक्रम समाजातील एकोपा, शैक्षणिक प्रगती आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश तायवाडे यांनी केले, तर आभार शिवकुमार पटवे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गणेश थोराईत, अमोल वऱ्हाडे, विजय तायडे, अक्षय तराळे, रुपेश तायडे आणि अनिल तराळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश अढागळे, सुभाष पटवी, मनोज तराळे, राजेश तायवाडे, रवी तायडे, जया तायडे, कार्तिका तायडे, सोनाली अमोल वऱ्हाडे, सारिका तराळे यांच्यासह समाजबांधव, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यांनी उचलला आर्थिक भार या कार्यक्रमासाठी ओतारी समाज संघाचे अध्यक्ष मुकेश वांद्रे, अल्केश बरगट, अतुल राऊत, गौरव सातघोडे, हरीश राऊत, जान्हवी सातघोडे, मंगेश राऊत, पियुष ओतोकार, प्रमोद तायडे, सतीश काकडे, शुभम सायगण, तुषार खंडारे आणि सचिन अढागळे आदी समाजबांधवांनी आर्थिक सहकार्य केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर