ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

टीम इंडियाच्या विजयाच्या जल्लोषाला महाराष्ट्रात गालबोट:अकोल्यात दगडफेक, पुण्यात हुल्लडबाजी; तर सांगलीत फटाक्यांमुळे आग

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ वर आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देश आनंदाने न्हाऊन निघाला असून महाराष्ट्रातही ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला. मात्र, दुर्दैवाने या आनंदाच्या वातावरणाला राज्यातील काही शहरांमध्ये गालबोट लागले आहे. सांगली, पुणे, अकोला आणि अमरावतीमध्ये हुल्लडबाजी आणि वादाच्या घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. अकोल्यातील हरिहरपेठ भागात परिस्थिती सर्वाधिक तणावपूर्ण होती. फटाके फोडण्यावरून दोन गटांत झालेल्या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन गट आमनेसामने आल्याने खळबळ उडाली. या दगडफेकीत चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली असून, यात काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून, दोषींची ओळख पटवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलिसांनी ‘कोंबिंग ऑपरेशन’ सुरू केले आहे. मिरजेत पोलिसांचा लाठीमार; तर सांगलीत अनर्थ टळला सांगलीच्या मिरज येथील लक्ष्मी मार्केट परिसरात विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या हजारो तरुणांच्या गर्दीने हुल्लडबाजीला सुरुवात केली. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दुसरीकडे, सांगली शहराच्या मारुती चौकात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मोठी दुर्घटना घडता घडता वाचली. फटाक्यांची ठिणगी दुकानाच्या छतावरील पालापाचोळ्यावर पडल्याने आग लागली. मात्र, वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि मोठी वित्तहानी टळली. पुणे आणि अमरावतीत ‘बेफाम’ जल्लोष पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रोड (FC रोड) वर तरुणांनी नियमांना पायदळी तुडवत हुल्लडबाजी केली. अलोट गर्दीमुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला होता, परिणामी पोलिसांना बळाचा वापर करून गर्दी पांगवावी लागली. तर अमरावतीतील राजकमल चौकात तरुणांनी एकमेकांच्या अंगावर थेट फटाके फेकत जीवघेणा जल्लोष केला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती हाताळली. धुळे आणि भंडाऱ्यात उत्साह कायम एकीकडे राज्यात काही ठिकाणी टीम इंडियाच्या विजयोत्सवाला गालबोट लागले असताना, इतर भागात उत्साहाचे वातावरण होते. धुळे शहरात तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरावर आणि डीजेच्या तालावर ठेका धरला. तर भंडाऱ्यातील मुस्लिम लायब्ररी चौकात क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करत भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर