ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

वडील नसल्याची जाणीव भासू दिली नाही:धनंजय मुंडेंना अश्रू अनावर, कॉलवर बोलताना ढसा-ढसा रडले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. या अनपेक्षित घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित दादांचे निकटवर्तीय समजले जाणारे आमदार धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे गाडीत बसून कॉलवर बोलताना त्यांना शब्द फुटत नसल्याचे पाहायला मिळाले. माझ्या सारख्याल वडील नाहीत याची कधी जाणीव नाही होऊ दिली, अशा भावना त्यांनी बोलून दाखवल्या. पुढे त्यांना बोलताही आले नाही, इतके त्यांना अक्षरशः रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले. धनंजय मुंडे यांच्यासह सर्वज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रतापराव चिखलीकर यांना देखील अश्रू अनावर झाले होते. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी अजित दादा म्हणत अश्रूंना वाट मोकळी केली. बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली असून एकच आक्रोश पाहायला मिळत आहे. अजित दादांची एक झलक पाहण्यासाठी कार्यकर्ते जमण्यास सुरू झाले आहेत. ‘आमचे दादा आम्हाला परत द्या’ आजूबाजूच्या गावातील हजारो नागरीक व कार्यकर्ते बारामती शहराच्या दिशेने येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा मोठा ताफा जमा झाले असून, आमचे दादा आम्हाला परत द्या, अशा आर्त हाका मारताना धाय मोकलून रडताना दिसत आहेत. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दादांच्या अकाली निधनाने मोठे नुकसान झाले- अनिल देशमुख राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अजितदादांच्या निधनाची बातमी समजली. तेव्हा त्यांना सुद्धा अश्रू अनावर झाले. त्यांनी दादांसोबत काम केलेल्या अनेक आठवणी माध्यमांशी बोलताना शेअर केल्या. दादांच्या अकाली निधनाने मोठे नुकसान झाले असून, ते भरून निघणारे नाही, अशी प्रतिक्रिया दिली. ही बातमी आम्ही अपडेट करत आहोत

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर