ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

बोटोणी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व गलितधान्य योजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी जगन्नाथ मंदिर सभागृहात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व गलितधान्य योजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले व मंडळ कृषी अधिकारी श्री. किशोर डोंगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना काढणीपश्चात तंत्रज्ञानाचा वापर, पीक संरक्षण उपाययोजना, नैसर्गिक शेती, फळबाग लागवड, बांबू लागवड व उत्पादन तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन देत सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक निविष्ठांची माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले, उप कृषी अधिकारी श्री. विनायक जुमनाके, श्री. सनथ खोसाळकर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी भगिनी व बांधव उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींबाबत मार्गदर्शन मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर