ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

कवितेचे कोडकौतुक:इस्लामपूरचे कवी एकनाथ पाटील यांना पहिला कवी अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कार जाहीर; संभाजीनगरमध्ये होणार गौरव

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठवाड्यातील मानाचा आणि पहिला कवी अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कार इस्लामपूरचे कवी एकनाथ पाटील यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या कवितासंग्रहाला जाहीर झालाय. रोख ११ हजार रुपये, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये लवकरच एका कार्यक्रमात कवी एकनाथ पाटील यांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ कवी श्रीधर नांदेडकर यांनी दिली. तब्बल 75 कवितासंग्रह आले छत्रपती संभाजीनगर येथील दिवंगत कवी अरुण कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ यावर्षीपासून हा काव्यपुरस्कार सुरू करण्यात आलाय. पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 75 कवींनी आपले काव्यसंग्रह पाठवले होते. त्यातून पहिल्या अरुण कुलकर्णी काव्यपुरस्कारासाठी एकनाथ पाटील यांच्या ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ या कवितासंग्रहाची निवड समितीने एकमताने निवड केली. दुहेरी पट अभिव्यक्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील अध्यक्ष असलेल्या या समितीत कवी संदीप जगदाळे आणि पत्रकार तुषार बोडखे यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ हा कवितासंग्रह वर्तमानातील गावाची, शेतीची दुरवस्था तसेच सभोवतालच्या सामाजिक, राजकीय परिस्थितीने निर्माण झालेले पेच असा एकमेकांत सरमिसळ झालेला दुहेरी पट अभिव्यक्त करतो, असे निरीक्षण परीक्षकांनी नोंदविले आहे. कसदार लेखन एकनाथ पाटील यांचे ‘सत्वशोधाच्या कविता’, ‘खुंट्यावर टांगलेली दुःखं’, ‘आरपार झुंजार’ आणि ‘अरिष्टकाळाचे भयसूचन’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांनी सात ग्रंथाचे संपादन केले असून ‘सॉक्रेटिस ते दाभोलकर-पानसरे व्हाया तुकाराम’ या रिंगणनाटकाच्या एका भागाचेही लेखन केले आहे. ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य पत्रिका’या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांना अनेक मानाचे काव्यपुरस्कारही मिळालेत. पुस्तके ग्रंथालयांना भेट संभाजीनगरमध्ये लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन करून कवी एकनाथ पाटील यांचा गौरव करण्यात येणार असून पुरस्कार समारंभानंतर पुरस्कारासाठी आलेले काव्यसंग्रह संभाजीनगर येथील महत्त्वाच्या ग्रंथालयाला भेट देणार असल्याचे पुरस्कार संयोजन समितीचे सदस्य कवी रवी कोरडे, पंकज अरुण कुलकर्णी,मंगेश घोडके, सुनील उबाळे यांनी कळवले आहे. एकनाथ पाटील यांचे कवितासंग्रह एकनाथ पाटील यांचे संपादित ग्रंथ इतर साहित्य व संपादन एकनाथ पाटील यांना मिळालेले पुरस्कार

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर