पुण्यात विषारी दारूचे तब्बल 15 बळी:दापोडी, फुगेवाडी, हडपसर, काळेपडळ भागातील घटना; मुख्यमंत्र्यांचे कडक कारवाई करण्याचे निर्देश

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे मृत्यूंची मालिका सुरू झाल्याने संपूर्ण शहर हादरलं आहे. आतापर्यंत 15 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अनेक नागरिक विविध रुग्णालयांत गंभीर अवस्थेत उपचार घेत आहेत. दापोडी, फुगेवाडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत ही घटना घडली असून, स्पिरिटयुक्त हातभट्टीची दारू प्यायल्याने नागरिकांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणामुळे पोलिस प्रशासनावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर या गंभीर प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी थेट पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिस आयुक्तांशी संपर्क साधला आहे. या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, दोन्ही शहरांच्या पोलिस आयुक्तांना समन्वयाने तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करा आणि कोणतीही हयगय करू नका, असे आदेश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे निर्देशही पोलिसांना देण्यात आले आहेत. मृतांची नावे 1) राहुल शरद क्षीरसागर (45 वर्ष) — पांढरे मळा, हडपसर
2) विजय भूकुरलाल शर्मा (45 वर्ष) — ससाणे नगर, हडपसर
3) अरुण डाडर — हडपसर
4) अशोक रमेश चव्हाण — काळेपडळ
5) विजय भूकुरलाल शर्मा — पांढरे मळा, ससाणे नगर, हडपसर
6) राजेश राजपूत — फुगेवाडी
7) पांडुरंग फुगे — फुगेवाडी
8) आनंद देसाई — फुगेवाडी
9) अकबर पठाण — फुगेवाडी
10) आनंद निकाळजे — फुगेवाडी
11) सुभाष डिगीकर — पिंपरी
12) अक्षय अवसरमल — पिंपरी
13) बाबा शेख — पिंपरी
14) राजेंद्र राठोड
15) विजय राठोड गंभीर अवस्थेत उपचार सुरू असलेले… 1) सुभाष डिगीकर – मेडी पॉईंट हॉस्पिटल
2) अक्षय अवसरमल – YCM हॉस्पिटल डॉक्टरांच्या मते या दोघांचीही प्रकृती अंत्यत चिंताजनक आहे. मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग याच्यासह आणखी 8 जणांना अटक या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी कर्नल विरखा सिंग याच्यासह आणखी 8 जणांना अटक केली आहे. आरोपींवर कठोर कलमे लावण्यात आली असून आणखी काही जणांना ताब्यात घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अबकारी विभागालाही तपासात सहभागी करण्यात आले असून अनेक ठिकाणी छापेमारी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी रात्रभर शहरातील विविध दारू अड्ड्यांवर धाडसत्र राबवले. ही विषारी दारू नेमकी कुठे तयार करण्यात आली आणि ती कोणकोणत्या भागात विकली गेली, याचा शोध सध्या घेतला जात आहे. या घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी परिसरात गुरुवारी एकाच दिवशी इतके मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. याशिवाय पुण्यातील काळेपडळ भागात 3 आणि हडपसरमध्ये 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या 48 तासांत आणखी 3 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अक्षय अवसरमल यांचा मृत्यू झाला, तर सौरभप्पा भंगारी यांचा मेडीपॉईंट रुग्णालयात मृत्यू झाला. भीमाप्पा बसवंत पुजारी यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी पोलिस प्रशासनावर संताप व्यक्त केला आहे. अवैध हातभट्टीची दारू परिसरात उघडपणे विकली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महापौर योगेश बहल यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. अशा बेकायदेशीर धंद्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळे निरपराध नागरिकांचे जीव जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दोषींवर कठोर कारवाई करून संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. बेकायदेशीर दारू तयार करणारे काही गुन्हेगार स्वस्तात जास्त “नशा” निर्माण करण्यासाठी किंवा प्रमाण वाढवण्यासाठी औद्योगिक रसायने मिसळतात. त्यात सर्वात धोकादायक पदार्थ म्हणजे मिथेनॉल (Methanol) होय. मिथेनॉल हा पिण्यासाठी नसलेला औद्योगिक अल्कोहोल आहे. तो पेंट, सॉल्व्हेंट, इंधन, केमिकल उद्योगात वापरला जातो. तो दिसायला आणि वासाने सामान्य अल्कोहोलसारखा वाटू शकतो, त्यामुळे लोकांना फसवणे सोपे जाते. पण शरीरात गेल्यावर तो अतिशय विषारी रसायनांमध्ये बदलतो आणि त्यामुळे अंधत्व, मेंदूचे नुकसान किंवा मृत्यू होऊ शकतो. मिथेनॉलमुळे नेमका धोका कसा होतो? शरीरात गेल्यानंतर मिथेनॉलचे रूपांतर फॉर्मल्डिहाइड आणि फॉर्मिक अॅसिडमध्ये होते. हे पदार्थ: मिथेनॉल विषबाधेची लक्षणे लक्षणे अनेकदा 6 ते 24 तासांनी दिसू शकतात: संशय आल्यास काय करावे? अशा घटना का घडतात? बेकायदेशीर दारू व्यवसायात खर्च कमी करण्यासाठी किंवा कृत्रिमरीत्या “किक” वाढवण्यासाठी काहीजण विषारी रसायने वापरतात. त्यामुळे दरवर्षी भारतातील विविध राज्यांत सामूहिक मृत्यूच्या घटना घडतात. अधिकृत परवानाधारक आणि सीलबंद उत्पादनांशिवाय दारू सेवन करणे अत्यंत धोकादायक ठरू शकते.

Leave a Comment

error: Content is protected !!