ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

जळगावचे नगरसेवक जाकीर खान यांच्या 2 ‎मुलींच्या जन्मात 15दिवसांचेच अंतर:प्रतिज्ञापत्राबाबत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची तक्रार‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जळगाव महापालिका निवडणुकीत ‎आणि शासकीय कामात लाभ ‎मिळवण्यासाठी बनावट जन्म‎दाखले सादर केल्याचा ‎खळबळजनक प्रकार समोर आला ‎आहे. नगरसेवक जाकीर खान रसूल‎ खान यांच्यावर बनावट कागदपत्रे‎ तयार करून प्रशासनाची फसवणूक‎ केल्याचा आरोप करत माजी‎ उपमहापौर तथा प्रतिस्पर्धी उमेदवार ‎कुलभूषण पाटील यांनी गुरुवारी ‎याबाबत महापालिका आयुक्त‎ आणि शहर पोलिस ठाण्यामध्ये ‎तक्रार दाखल केली आहे. त्यात‎ त्यांनी खान यांच्या दोन्ही मुलींच्या ‎जन्मात 15 दिवसांचेच अंतर ‎असल्याची कागदपत्रे जोडली आहे.‎ तक्रारदार पाटील यांनी दिलेल्या‎तक्रारीनुसार 2026च्या महापालिका‎निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10‎‘ड”मधून जाकीर खान रसूल खान‎यांनी निवडणूक लढवली होती.‎ या वेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्याला तीन‎ अपत्ये असल्याचे नमूद केले होते; मात्र पाटील ‎यांनी महापालिकेतून माहिती काढली असता‎ धक्कादायक माहिती समोर आली.‎ कागदपत्रांनुसार जाकीर खान यांना पाच अपत्य ‎असल्याचे दिसून आले आहे. निवडणुकीसाठी‎ अपत्यांची खरी संख्या लपवून खोटी माहिती‎ दिल्याचा आणि महापालिकेच्या जन्म-मृत्यू‎ विभागाची दिशाभूल करून बनावट दाखले ‎मिळवल्याचा आरोप जाकीर खान यांच्यावर ‎करण्यात आला आहे. चौकशी करून गुन्हा‎ दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.‎
पंधरा दिवसांच्या अंतराने दोन मुली‎ ​तक्रारदार कुलभूषण पाटील यांनी सादर केलेल्या पुराव्यांत‎सर्वात थक्क करणारी बाब म्हणजे दोन मुलींच्या जन्मातील‎ अंतर हे होय. महापालिकेच्या रेकॉर्डनुसार केवळ 15‎ दिवसांचे आहे. ​पहिल्या अपत्याचा जन्म दिनांक 2/ 09/‎2000 (नोंदणी तारीख: 13/09/2000). ​दुसऱ्या अपत्याचा ‎जन्म दिनांक 17/09/2000 चा दाखवण्यात आला आहे.‎ त्याची नोंदणी तारीख 14/08/2007 आहे.‎ पुढे काय?‎ तक्रारदार यांनी‎ महापालिका व ‎पोलिसांकडे दिलेल्या‎ तक्रारीवरून मनपाने‎ चौकशी करून त्यात तथ्य ‎आढळल्यास मनपा ‎स्वत:च फसवणूक ‎झाल्याची तक्रार दाखल‎ करेल.महिनाभरात ही ‎कार्यवाही न झाल्यास स्वत:‎तक्रारदार पाटील ‎यांच्याकडून पोलिस तक्रार‎ घेऊन गुन्हा दाखल‎ करतील.‎‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर