ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

छेड काढण्याचा प्रयत्न झाला तर दामिनी पथकाशी संपर्क साधा:API प्रेमलता जगताप यांचे आवाहन; बाळापुरात विद्यार्थीनींसोबत साधला संवाद

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनींची छेड काढण्याचे प्रकार होत असल्यास तातडीने नजीकच्या पोलिस ठाण्याशी किंवा दामिनी पथकाशी संपर्क करण्याचे आवाहन दामिनी पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रेमलता जगताप यांनी केले आहे. आखाडा बाळापूर (ता.कळमनुरी) येथील दोन महाविद्यालयातील विद्यार्थीनींशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जमादार सीमा पाटील, वर्षा शिंदे, आरती साळवे, रवीना घुमनर, हिंमतराव सरनाईक यांची उपस्थिती होती. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक जगताप यांनी आखाडा बाळापूर येथील राजर्षी शाहूी महाविद्यालयातील विद्यार्थीनींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींच्या अडचणी जाणून घेतल्या. शाळा, महाविद्यालय गावापासून काही अंतरावर असल्याचा गैरफायदा टारगट मुलांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थीनींना निर्भयपणे शाळा, महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली दामीनी पथक स्थापन केले आहे. या पथकाकडून शाळा, महाविद्यालय तसेच बसस्थानक, रेल्वेस्थानकावर भेट देऊन पाहणी करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी देखील छेडछाडीचे प्रकार होत असल्यास न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे यावे. तक्रार देणाऱ्या विद्यार्थीनींचे नांव गोपनिय ठेवले जाईल असे आश्‍वासन त्यांनी विद्यार्थीनींना दिले. या शिवाय ११२ हा क्रमांक २४ तास सक्रिय असून या क्रमांकावरही तक्रार देता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी राजर्षी शाहू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच नारायणराव वाघमारे महाविद्यालयातील प्राचार्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. विद्यार्थीनींच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज आहेच पण शाळा, महाविद्यालयांनी देखील योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर