ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

महावितरणच्या जनजागृती रॅलीचा मारेगावात धडाका!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

स्मार्ट मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी थेट जनतेत संवाद

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव शहरात स्मार्ट मीटरबाबत पसरलेल्या गैरसमजांना जोरदार उत्तर देत महावितरण विभागाने जनजागृतीची धडाकेबाज रॅली काढली. वीजबिल दुप्पट होणार, अशी अफवा पसरल्यामुळे ग्राहकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी मारेगाव विद्युत महावितरण कार्यालयाने थेट रस्त्यावर उतरून जनतेशी संवाद साधला.

महावितरणकडून बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या फायद्यासाठीच असून त्यातून वीज वापराची अचूक नोंद, पारदर्शक बिलिंग आणि वेळेवर माहिती उपलब्ध होणार आहे, असा स्पष्ट संदेश या पदसंचलनातून देण्यात आला. “स्मार्ट मीटर – ग्राहकांच्या हितासाठी”, “वेळेवर वीजबिल भरा, महावितरणला सहकार्य करा” अशा घोषणा देत रॅलीने शहरातील प्रमुख मार्ग दणाणून सोडले.

रॅलीदरम्यान माहिती फलकांच्या माध्यमातून स्मार्ट मीटरची वैशिष्ट्ये, त्याचे फायदे आणि गैरसमजांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यामुळे अनेक वीज ग्राहकांनी थांबून माहिती जाणून घेतली आणि शंका विचारत प्रतिसाद दिला.

उपकार्यकारी अभियंता श्यामसुंदर कुर्रा यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या पदसंचलनात कार्यालयीन कर्मचारी तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शहरातील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करत रॅलीचा समारोप महावितरण कार्यालयात करण्यात आला.

स्मार्ट मीटरविषयी निर्माण झालेल्या संभ्रमाला थेट उत्तर देत महावितरणने ‘जनतेशी संवाद, विश्वासाची हमी’ हा संदेश दिला असून या उपक्रमामुळे ग्राहकांमधील गैरसमज दूर होण्यास मोठी मदत होणार असल्याचे चित्र दिसून आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर