ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

धावत्या टाटा एस गाडीला लागली आग.

64 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

बुरांडा व बोटोनीच्या मधातील राज्य महामार्गावरील घटना.

मारेगाव तालुका प्रतिनीधी..
सुरेश पाचभाई  [ 992286218]

सविस्तर वृत्त असे की..
वणी यवतमाळ राज्य महामार्गावरील बुरांडा व बोटोनी च्या मधात धावत्या टाटा एस या गाडीला अचानक आग लागून समोरील कँबिन जळून खाक झाल्याची घटना आज दिनांक 30 मार्च 2022 रोज बुधवारला सकाळी सुमारे 11वाजताच्या सुमारास घडलीआहे.या घटनेत कुटलीही जिवीतहानी झाली नाही. मारेगाव पोलिसांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले यश.

मिळालेल्या माहितीनुसार हे वाहन वणी येथून यवतमाळकडे जात असतांना राज्यमहामार्गावरील बुरांडा व बोटोनीच्या मधात अचानक धावत्या वाहनाने पेट घेतली.आग लागताच वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजुला लावून वाहनातून बाहेर पडला.आणि काही वेळातच गाडीचा समोरील भाग पुर्ण पणे आगीने रौद्ररूप धारण केले होते. मारेगाव पोलिसांच्या सतर्केते मुळे गाडीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.



मारेगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच वाहतूक शिपाई नितीन खांदवे व पोलीस वाहन चालक अतुल हिवरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी तात्काळ पोलीस वाहन व अँटोच्या साह्याने थेट बोटोणी येथून पाणी आणून आगीववर नियंत्रण मिळविले आणि टेम्पोचा मागील भाग शाबूत ठेवण्यावर यश मिळविले पण गाडीचा पुडचा भाग जळला आहे.पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर