ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

आमच्या पक्षात लुडबूड नको!:हसन मुश्रीफ म्हणाले- रोहित पवारांनी तटकरे, पटेलांना टार्गेट करणे चुकीचे; NCP विलीनीकरणाची चर्चा अजितदादा करत होते

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रोहित पवार यांच्या काकांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांना जितके दु:ख झाले, त्यापेक्षा जास्त दु:ख आम्हाला झाले आहे. आमच्या मनात काही शंका आहेत. त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केल्या आहेत. आमच्या पक्षातील अंतर्गत गोष्टीमध्ये रोहित पवारांनी भाग घेऊ नये. त्यांनी अजित पवारांच्या अपघाताबद्दल जी माहिती दिली, त्याबद्दल पुतण्या म्हणून त्यांची अस्वस्थता मी समजू शकतो, पण त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना टार्गेट करणे चुकीचे आहे, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी व्यक्त मांडली. हसन मुश्रीफ म्हणाले की, विलीनीकरणाचा मुद्दा मी अनेकवेळा मांडलेला आहे. अजित पवार त्यासंदर्भात चर्चा करत होते, राष्ट्रवादी काँग्रेसचा कोणताही नेत्या त्या चर्चेत नव्हता. त्यामुळे त्यांची चर्चा झाली नाही, असा काय आमचा दावा नाही. दादा गेल्यावर परिस्थिती बदललेली आहे. आपल्याला भाजपला विश्वासात घ्यावे लागेल. त्यांचे यावर काय मत आहे हे बघावे लागेल.सुनेत्रा पवार यांना काय वाटते ते यापुढे पक्षात होईल. अपघाताची सखोल चौकशी करावी हसन मुश्रीफ म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी मुंबई आणि दिल्लीमध्ये अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, लोकांच्या मनातील शंका गेल्याच पाहिजे. विमान अपघात प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे, फडणवीसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. तटकरे- पटेल व्हिलन कसे? हसन मुश्रीफ म्हणाले की, अजित पवार,सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची एकवेळा भेट झाली असेल का? त्यांची अनेक वेळा भेट झाली असेल. प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार साहेबांपासून कार्याध्यक्ष आहेत. अजित पवार यांच्यानंतर तेच आमचे प्रमुख आहेत. सुनेत्रा पवारांना अध्यक्ष केल्यानंतरही ते कार्याध्यक्ष राहणार आहेत. तर सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत. हे दोघे व्हिलन कसे असू शकतात, त्यांना टार्गेट कसे करता येऊ शकते. विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू असून आमच्या पक्षात लुडबूड करत आहेत. विलीनीकरणाची माहिती नव्हती हसन मुश्रीफ म्हणाले की, विलीनीकरणाच्या चर्चेत मी नव्हतो, पण ही मंडळी म्हणत आहे की शरद पवार यांनी थांबायचे आणि अजित पवार यांच्या हाती सूत्र द्यायची. शशिकांत शिंदे हे त्या चर्चेत असायचे. स्थानिकसाठी एका चिन्हावर लढा असे आम्हाला सांगण्यात आले होते, पण विलीनीकरणाबद्दल आम्हाला काही माहिती नव्हती. शशिकांत शिंदेंचा लेख शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ‘राष्ट्रवादी’ साप्ताहिकातून विलीनीकरणाच्या मुद्यावर सविस्तर भाष्य केले आहे. या लेखात ते म्हणतात, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण करून एक समर्थ व एकसंघ पक्ष उभा करण्याचे आमचे स्वप्न होते. विशेष म्हणजे या नव्या रचनेत पक्षाची सर्व धुरा अजितदादांच्या खांद्यावर सोपवून त्यांच्या त्यांच्या नेतृत्वाखाील काम करण्याचे आम्ही निश्चित केले होते. दुर्दैवाने काळाने आघात घातला आणि दादांचे हे स्वप्न अपूर्णच राहिले. दादांच्या निधनामु्ळे पक्षाचे व राज्याचे मोठे नुकसान झाले, अशा शब्दांत शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखात अजित पवारांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.’ तटकरेंचा वेगळा सूर सुनील तकरे यांनी काल नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली. तटकरे म्हणाले की, २०१४ आणि २०१९ पासूनच भाजपसोबत सत्तेत असावे ही अजितदादांची अधिकृत भूमिका होती. त्यानुसार शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या मूळ विचारधारेसह आमचा एनडीएतील सहभाग कायम आहे. २०१४ पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत सत्तेत असावे, अशी अजित पवारांची स्पष्ट भूमिका होती. ती त्यांनी पक्षाच्या सर्व अंतर्गत बैठकींमध्ये मांडली होती. २०१९ चा पहाटेचा शपथविधी हा त्याचाच भाग होता. तीन पक्षांच्या खिचडी सरकारपेक्षा दोन पक्षांचे (भाजप-राष्ट्रवादी) सरकार महाराष्ट्राला प्रगतिपथावर नेईल, असा विश्वास त्यांना होता. नेमके बिनसले कुठे? सूत्रांनी सांगितले की, २०१९ मध्ये शरद पवारांनी ७२ तासांत शब्द फिरवला होता. तरीही अजित पवारांनी हयात असताना शरद पवार सत्तेत सहभागी होतील, अशी हमी घेतली असावी. त्यामुळेच अमित शाह यांनी विलीनीकरणास हिरवा कंदील दाखवला असावा. मात्र, अजितदादांच्या मृत्यूनंतर शरद पवार सत्तेत सहभागाचा शब्द पाळतील अशी पूर्ण हमी घेणारा नेता नाही. त्यामुळे विलीनीकरण बारगळले. शरद पवार गटाच्या नेत्यांना सोबत घेऊन नवी डोकेदुखी कशासाठी, असे अजित पवार गटाच्या नेत्यांना वाटते. त्याचाही परिणाम झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर