ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

परिक्षेला 1,198 विद्यार्थी; 145 जणांची दांडी:दर्यापूर शहरातील 3 केंद्रांवर सुरळीतपणे करण्यात आले आयाेजन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


केंद्र सरकार संचालित पीएमश्री नवोदय विद्यालयात आगामी शैक्षणिक वर्षात सहावी साठीची प्रवेश परीक्षा नुकतीच दर्यापूर शहरातील ३ परीक्षा केंद्रावर शांततेत पार पडली. या परीक्षेसाठी १ हजार ३३८ विद्याथ्यर्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ३ केंद्रांवर १ हजार १९८ विद्यार्थ्यांनी नवोदय प्रवेश परीक्षेचा पेपर दिला. तर परीक्षेसाठी ३ केंद्रांवरील जवळपास १४५ विद्यार्थ्यांची गैरहजेरी दिसून आली. दर्यापूर शहरातील ३ केंद्रांवरील परीक्षेसाठी तब्बल १ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्याने अर्जाची संख्या मागील वर्षीच्या तुलनेत जास्त अर्ज आले होते. त्यामुळे अमरावतीच्या नवोदय विद्यालयात सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षांमध्ये इयत्ता सहावीसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी मोठी रस्सीखेच होणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीनी प्रवेशपत्र, परीक्षा लेखन साहित्य व ओळखपत्रासह उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे शनिवारी सकाळी ९ वाजता पासूनच अनेक पालक आपल्या पाल्यांसह शहरात येताना दिसत होते. सकाळी १० वाजता विविध केंद्रावर पालकांसह विद्यार्थ्यांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते. सकाळी १० वाजता पासूनच पालकांनी पाल्यांना सोडण्यासाठी शहरातील परीक्षा केंद्रांवर गर्दी केली होती. थंडीतही केंद्रावर गर्दी थंडीमय वातावरणामुळे आपल्या वाहनातून अनेकजण आल्याने परीक्षा केंद्रासमोर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. किमान एक तास आधी येण्याच्या सूचना दिल्याने ग्रामीण भागांसह शहरी भागातील पालकांनी सकाळी ९ वाजता पासूनच हजेरी लावली. शंभर गुणांची परीक्षा शंभर गुणांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत एकूण ८० प्रश्न विचारण्यात आले होते. अर्थात एका प्रश्नासाठी १.२५ गुण होते. तसेच नवोदय परीक्षेचा पेपर सुटल्यानंतरही विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकांची दुचाकी, चारचाकीसह गर्दी दिसून आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर