ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

विमानाच्या शेपटीतील ब्लॅक बॉक्स जळाला कसा?:आमदार अमोल मिटकरींचा सवाल; दादांच्या विमानाची टेल जळाली नसल्याकडे बोट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाल्याच्या दाव्यावर जोरदार आक्षेप घेतला आहे. विमानाचा ब्लॅकबॉक्स हा त्याच्या शेपटीत असतो. अजित पवारांच्या अपघातात विमानाच्या शेपटीला काहीच झाले नाही, मग हा ब्लॅकबॉक्स जळाला कसा? असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. अजित पवारांचा गत 28 जानेवारी रोजी बारामतीत झालेल्या एका विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांच्या मृत्यूविषयी शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. त्यातच आता विमानाच्या ब्लॅकबॉक्समधील माहिती रिकव्हर होत नसल्याच्या मुद्यावर गंभीर संशय व्यक्त केला जात आहे. अमोल मिटकरी यांनी हा ब्लॅकबॉक्स जळाल्याचा मुद्दाच फेटाळून लावला आहे. या प्रकरणी त्यांनी अजित पवारांच्या विमानाची शेपटी सुस्थितीत असल्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. नेमके काय म्हणाले अमोल मिटकरी? अमोल मिटकरी म्हणाले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की, विमानाचीटेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो अपघात झाला त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही. तसेच ब्लॅक बॉस असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचर मध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो. आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला? असे त्यांनी म्हटले आहे. ब्लॅकबॉक्स केव्हा नष्ट होऊ शकतो? अमोल मिटकरींनी ब्लॅक बॉक्स कधी जळू शकतो किंवा नष्ट होऊ शकतो? हे ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, अत्यंत आग / उष्णता: अपघातानंतर लागलेली आग जर 1,100°C पेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली, तर आतले घटक — विशेषतः फ्लॅश मेमरी — उष्णतेमुळे खराब होऊ शकतात. अत्यंत जोराचा धक्का: 3,400 Gs पेक्षा जास्त धक्का (जो सामान्य, अगदी प्राणघातक अपघातांपेक्षाही खूप जास्त असतो) बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकते. पर्यावरणीय घटक: खोल समुद्रात दीर्घकाळ मीठ पाण्यात राहिल्यास गंज (corrosion) होऊ शकतो आणि त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते. मात्र, ब्लॅक बॉक्स 30 दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाइन केलेला असतो. पायलटचा दिनक्रम जाहीर करण्याची मागणी अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या विमानाच्या पायलटचा दिनक्रम जाहीर करण्याचीही मागणी केली आहे. ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण ! आता ब्लैक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व “लवकरच” विमान अपघाताची माहिती मिळणार असे समजतो. आम्ही वाट पाहू पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज ,पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता व कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिक मध्ये अडकले , त्या ठिकाणचे cctv फुटेज व सर्व या पायलटचा 28 जानेवारी 2026 चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्यावा ही विनंती, असे ते म्हणालेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर