ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

राष्ट्रीय कबड्डीपटूच्या खुन्यास जन्मठेप:नराधमाने एकतर्फी प्रेमातून 8 वीतल्या मुलीची चाकूचे 22 वार करून केली होती हत्या

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एकतर्फी प्रेमातून १५ वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीचा खून करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा निकाल दिला. आरोपीला पाच हजार रुपये दंडाची शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. शुभम ऊर्फऋषिकेश बाजीराव भागवत (वय २२) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १२ ऑक्टोबर २०२१ रोजी बिबवेवाडीतील यश लॉन्स येथे घडली होती. मृत मुलगी आठवीत शिकत होती. मुलीने प्रेमास नकार दिल्याने आणि फोनवर बोलणे टाळल्याच्या रागातून आरोपीने तिच्यावर चाकूने २२ वेळा वार केले. तक्रारीनुसार, आरोपीने मुलीचा गळा चिरून तिचे धड शरीरापासून वेगळे केले होते, अशी माहिती बिबवेवाडी पोलिसांनी दिली. मुलीच्या चुलत बहिणीने या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विशेष सरकारी वकील ॲड. हेमंत झंजाड यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, “हा दुर्मिळातील दुर्मीळ गुन्हा आहे. या प्रकरणात एकूण १२ साक्षीदारांनी साक्ष नोंदवली. त्यापैकी प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीला न्यायालयात ओळखले आणि निर्भीडपणे साक्ष दिली. मृत मुलगी तिच्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य होती.” न्यायाधीशांनी आपल्या निरीक्षणात म्हटले की, हा खटला दुर्मिळातील दुर्मीळ प्रकरणांच्या श्रेणीत येईल असे मानणे कठीण आहे, परंतु सरकारी पक्षाच्या म्हणण्यानुसार हा गुन्हा क्रूर होता. शवविच्छेदन अहवालानुसार, मुलीच्या मृतदेहावर २५ छेदलेल्या जखमा आढळल्या होत्या. या गुन्ह्यासाठी मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा अशा दोनच तरतुदी आहेत. जन्मठेप हा नियम आहे आणि मृत्युदंड हा अपवाद आहे. मृत्युदंडाची शिक्षा देऊन हे अपवादात्मक प्रकरण म्हणून घोषित करणे न्यायिक मनाला पटत नाही. त्यामुळे जन्मठेपेची शिक्षा ही आरोपीसाठी योग्य शिक्षा आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर