ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

राज्यसभेच्या 7 जागांसाठी रणधुमाळी:भाजपकडून तावडे, आठवलेंसह पाच नावांची चर्चा, ‘निष्ठावंत’ विरुद्ध ‘आयाराम’ संघर्ष पेटणार?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातील विविध राज्यांतील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक आयोगाने बिगुल वाजवले आहे. एप्रिल २०२६ मध्ये कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांच्या जागी ही निवडणूक होणार असून, महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांसाठी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपमध्ये पुन्हा एकदा ‘निष्ठावंत विरुद्ध आयाराम’ असा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख 5 मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर 6 मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी 9 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया 16 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल त्यानंतर जाहीर केले जातील. भाजपमध्ये इच्छुकांची ‘भाऊगर्दी’; निष्ठवंतांचा पवित्रा राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही वर्षांत पक्षाने बाहेरून आलेल्या नेत्यांना (आयारामांना) राज्यसभा किंवा विधान परिषदेवर अधिक संधी दिल्याचा सूर भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे, “आता तरी केवळ निष्ठावंतांचा विचार करावा,” अशी मागणी पक्षातील एका मोठ्या गटाने लावून धरली आहे. ही नावे चर्चेच्या अग्रभागी राज्यसभेवर जाण्यासाठी भाजपमधून अनेक दिग्गज नेत्यांची नावे चर्चेत आहेत. २ एप्रिलला महाराष्ट्रातील या ७ खासदारांची जागा रिक्त होणार अशी होते राज्यसभा निवडणूक राज्यसभा खासदारांसाठी निवडणुकीची प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा खूप वेगळी आहे. राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्षपणे निवडले जातात, म्हणजे जनता नाही तर आमदार त्यांना निवडतात. निवडणुका दर दोन वर्षांनी होतात, कारण राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे आणि त्याचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात. राज्यसभा जागांची एकूण संख्या 245 आहे. यापैकी 233 जागांवर अप्रत्यक्षपणे निवडणुका होतात आणि 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात. राज्यसभा निवडणुकीत विजयासाठी किती मतांची आवश्यकता असते, हे आधीच ठरलेले असते. मतांच्या संख्येची गणना एकूण आमदारांची संख्या आणि राज्यसभा जागांच्या संख्येच्या आधारावर होते. यात एका आमदाराच्या मताचे मूल्य 100 असते. बॅलेट पेपरवर खास पेनाने मतदान होणार निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, मतदान करताना केवळ रिटर्निंग ऑफिसरने दिलेल्या निश्चित मानकाचा व्हायलेट रंगाचा स्केच पेनच वापरला जाईल. इतर कोणत्याही पेनाचा वापर वैध मानला जाणार नाही. आयोगाने म्हटले आहे की, निवडणुका शांततापूर्ण आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी निरीक्षक नियुक्त केले जातील. निवडणूक आयोगाने आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये EVM आणि VVPAT बाबत जनजागृती मोहीम देखील सुरू केली आहे. आयोगाच्या मते, 5 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात 1.20 लाखांहून अधिक लोकांनी डेमो कॅम्पमध्ये भाग घेतला. 1.16 लाखांहून अधिक लोकांनी मॉक मतदान केले. 10 फेब्रुवारीपर्यंत 29 हजारांहून अधिक मतदान केंद्रांची ठिकाणे मोबाइल डेमो व्हॅनद्वारे कव्हर केली गेली आहेत. ही मोहीम EVM डेमो सेंटर आणि मोबाइल व्हॅनद्वारे राबवली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर