ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता:मनोज जरांगेंचा आणखी एक आरोप; प्रकरण फडणवीसांच्या नातेवाईकाशी संबंधीत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक गंभीर प्रकरण उघड केल्याचा दावा केला आहे. रंजना नागपूरकर या महिलेने केलेल्या आरोपांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या पती प्रदीप नागपूरकर हे पोलिस दलात कार्यरत होते. एका प्रकरणाचा निकाल अनुकूल लावून देण्यासाठी धनंजय मुंडे यांना 17 लाख रुपये देण्यात आल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. मात्र पैसे देऊनही अपेक्षित काम झाले नाही, असे त्यांनी म्हटले आहे. जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक व्यवहारामुळे आणि कामाच्या अनिश्चिततेमुळे नागपूरकर कुटुंबावर मोठा मानसिक ताण निर्माण झाला. रंजना नागपूरकर यांनी असा दावा केला आहे की, या प्रचंड मानसिक दबावाखालीच त्यांच्या पतीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्या पूर्णपणे कोलमडून गेल्या असून न्याय मिळावा म्हणून त्यांनी आपली व्यथा मांडली आहे, असे जरांगे यांनी सांगितले. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही केली. या आरोपांदरम्यान जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही उल्लेख केला. देवेंद्रजी, कदाचित तुम्हाला ही बाब माहिती नसेल; पण हा प्रकार तुमच्याच जवळच्या नातेवाईकांशी संबंधित आहे, असे ते म्हणाले. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्या बहिणीची मुलगी नागपूरकर यांच्या घरी दिलेली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्यामुळे हे प्रकरण तुमच्या जवळच्या पाहुण्यांशी संबंधित आहे, असे सांगत त्यांनी सरकारने संवेदनशीलतेने लक्ष घालावे, असे आवाहन केले. जरांगे पाटील यांनी पुढे सांगितले की, रंजना नागपूरकर त्यांच्याकडे भेटीसाठी आल्या होत्या. त्या अत्यंत व्यथित अवस्थेत होत्या आणि रडत होत्या, असे त्यांनी सांगितले. पतीच्या निधनाला हेच प्रकरण कारणीभूत असल्याचा त्यांचा ठाम आरोप आहे. न्याय मिळवण्यासाठी त्या प्रयत्न करत असून, आपले पैसे परत मिळावेत आणि जबाबदारांवर कारवाई व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. मुंडे यांच्या समोरच पिस्तूल लावले – रंजना नागपूरकर रंजना नागपूरकर यांनी केवळ पैशांची फसवणूक झाल्याचा आरोप केलेला नाही, तर धमकीचाही गंभीर दावा केला आहे. पतीच्या निधनानंतर जेव्हा त्या आपले पैसे परत मागण्यासाठी परळी येथे गेल्या, तेव्हा त्यांना मुंडे यांच्या समोरच पिस्तूल लावून धमकावण्यात आले, असा त्यांचा आरोप आहे. पैसे परत न देता उलट जीवे मारण्याची भीती दाखवून त्यांना हाकलून लावण्यात आले, असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व आरोपांमुळे राज्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी विविध स्तरातून होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर