ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

निवडणुकीसाठी तिजोरीवर डल्ला, 71 लाख बहिणींना योजनेतून वगळले:आधी सरसकट वाटप, आता नियम-अटी, शशिकांत शिंदेंचा सरकारवर घणाघात

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लाडकी बहीण योजनेचे श्रेय अनेकांनी घेतले. निवडणुकीत फायदा व्हावा म्हणून निकष ,नियम न बघता राज्याच्या तिजोरीतून पैसे वाटण्यात आले. आता आर्थिक बोजा पडू लागला म्हणून नियम, निकष लावण्यात आले आणि आता 71 लाख बहीणींना त्यापासून वंचित केले जात आहे. आम्ही तेव्हाही सांगत होतो हे सरकार केवळ मतांसाठी राजकारण करते, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटले आहे. शशिकांत शिंदे म्हणाले की, अशोक खरात प्रकरणी एसआयटी चौकशी सुरू आहे. त्यामध्ये बरेच काही माहिती समोर येत आहे. आपण पोलिस आणि एसआयटी चौकशीला वेळ दिला पाहिजे. खरातची पत्नी दोन दिवसांपासून फरार आहे त्या का भेटत नाही याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे. ..अजितदादांच्या पक्षावर आम्ही बोलणार नाही शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्या पक्षाने जर जय पवारांना राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये घेतले असेल तर तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांनी राजकारणात यायला काही अडचण नाही. जय पवारांनी त्यांचे कर्तृत्व दाखवावे. त्यांच्या पक्षाची अंतर्गत काही चर्चा झाली यावर आम्ही बोलणे योग्य नाही. पण सुनेत्रा पवारांनी घेतलेला निर्णयावर त्या सांगू शकतील. अजित पवार यांच्यापक्षाबद्दल बोलण्याचा माझा काहीही संबंध नाही. त्यावर मी बोलणार नाही. त्यांनी सत्य तरी मान्य केले शशिकांत शिंदे म्हणाले की, अजित पवार यांच्यासोबत आमची विलनीकरणाबद्दल चर्चा झालीच होती हे आम्ही अधीच सांगितले होते. जे काही त्या चर्चेत ठरले होते ते ठरले होते. आता काही लोकांनी सत्य सांगितले आहे. आता त्यावर काही लोकांनी उशिरा का होईना सत्य मान्य केले.
हे वृत्तही वाचा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, 71 लाख महिला अपात्र:ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत संधी! 1 कोटी 75 लाख महिलांना मिळणार लाभ राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता मोठ्या वादाच्या भोऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेत तब्बल 71 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या अपात्र महिलांच्या खात्यावर गेल्या 20 महिन्यांत सरकारने सुमारे 21 हजार 300 कोटी रुपये जमा केले आहेत. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर