ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

अजित पवारांचा विमान अपघात हा घातपातच:आमदारांचा अवमान करणारे पोलिस अधिकारी कुणाच्या जीवावर मस्ती करतायत?- अमोल मिटकरी

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवार यांचा विमान अपघात हा घातपातच आहे, यावर मी सुरुवातीपासून ठाम आहे. ज्यांना हा घातपात वाटत नाही, त्यांनी तो केवळ अपघात होता हे सिद्ध करून दाखवावे, असे थेट आव्हान आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आहे. सुमित कपूर जर जिवंत असेल, तर मग ते विमान नेमके कोण चालवत होते? शांभवी पाठक की अन्य कोणी? हे सत्य समोर आले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. अमोल मिटकरी पुढे म्हणाले की, अपघाताच्या वेळी डीजीसीएने (DGCA) विमानात 6 जण असल्याचे सांगितले होते. 5 जणांचे मृतदेह सापडले आणि घड्याळावरून त्यांची ओळख पटली, असेही सांगण्यात आले. मात्र, आता मृतदेहाच्या हातात घड्याळ नव्हती, ती सापडलीच नाही असे म्हटले जात आहे. नेमके झाले काय? सुमित कपूर यांच्या पत्नीने पती जिवंत असल्याची पोस्ट केली आहे, मग विमान कोण चालवत होते? असे ‘जर-तर’चे प्रश्न लोकांच्या मनात राहू नयेत. जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत दादांच्या अपघाताबाबत प्रश्न विचारत राहू. या प्रकरणावर पडदा पडला असे कोणी समजू नये, तो विचारण्याचा आमचा हक्क आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला कोणाचा फोन आला आणि त्यानंतर त्यांनी FIR का दाखल केला नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. डीजीसीएला मोठी किंमत मोजावी लागेल अमोल मिटकरी म्हणाले की, मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दिलेली तक्रार एसआयटीकडे (SIT) वर्ग केली की नाही, याची माहिती नाही. मात्र, या मुद्द्यावर बारामतीसह राज्यातील जनता रस्त्यावर उतरत आहे. आमदार रोहित पवार ज्या पद्धतीने हा मुद्दा लावून धरत आहेत आणि डीजीसीएची तांत्रिक माहिती समोर आणत आहेत, त्यामुळे डीजीसीएला घाम फुटला आहे. त्यांनी VSR वर कारवाई केली असली, तरी ते यातून सुटणार नाहीत, त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. ज्या अधिकाऱ्यांनी अजित पवारांचा घात घडवून आणला आहे, त्यांच्यावर FIR झालाच पाहिजे. जो कोणी आमदार या अपघाताच्या चौकशीसाठी पुढाकार घेईल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी पक्ष विसरून त्यांच्या सोबत असेन, असे मिटकरींनी स्पष्ट केले. पोलिसांना कुणाचा फोन आला अमोल मिटकरी म्हणाले की, मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये काल जे घडले ते संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवाजी पिंगळे यांनी आमचे म्हणणे समजून घेतले होते, त्यावेळी रोहित पवार आणि कायदेशीर सल्लागारही सोबत होते. मात्र, 4 आमदार तिथे बसलेले असताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने तिथे येऊन FIR प्रक्रिया थांबवली. त्यांना कोणाचा फोन आला आणि ते आम्हाला ‘लॉ’ का शिकवत होते? तक्रार घेतो पण गुन्हा दाखल करत नाही, ही वरिष्ठ पोलिसांची उत्तरे अत्यंत निंदनीय आणि वेदनादायी होती. मरीन ड्राईव्ह पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यामुळे आता रोहित पवार बारामती पोलिसांकडे गेले आहेत, तिथे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. 4-4 आमदारांचा अवमान करणारे आणि उन्मत्तपणे बोलणारे पोलीस अधिकारी कोणाच्या जीवावर मस्ती करत आहेत? त्यांना कसला माज आहे? याचा जाब विचारण्याचा मला संविधानिक अधिकार आहे, असेही अमोल मिटकरी यांनी ठणकावून सांगितले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर