ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

‘नीट’ पेपरफुटी; मनसेचा ‘आरसीसी’वर हल्लाबोल:क्लासच्या फलकांसह मोटेगावकराच्या प्रतिमेला फासले काळे, बॅनरही फाडले‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याच्या शहरातील आरसीसी कोचिंग क्लासेसविरोधात सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या अशा प्रवृत्तीविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेत क्लासच्या फलकाला काळे आणि शिवराज मोटेगावकर याच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले. तसेच आरसीसी क्लास परिसरातील संबंधित बॅनर फाडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मनसेच्या वतीने प्रशासनाला इशारा देण्यात आला की, येत्या आठ दिवसांत विद्यार्थ्यांचे संपूर्ण पैसे परत करण्यात यावेत तसेच आरसीसी कोचिंग क्लासेस कायमस्वरूपी अकोल्यातून बंद करण्यात यावेत. अन्यथा मनसेच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनात संपर्क अध्यक्ष हेमंत गडकरी, शहराध्यक्ष सौरभ भगत, मनविसे जिल्हाध्यक्ष रणजीत राठोड, मुकेश धोंडफळे, सौरभ फाले, विजय बोचरे, सर्कल प्रमुख निलेश स्वर्गीव, नारायण मेहरे आदी उपस्थित होते. वर्षानुवर्षे वैद्यकीय प्रवेशासाठी ‘लातूर पॅटर्न’ हा परवलीचा शब्द मानला जात होता. मात्र, या पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या अकोल्यातील विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. यामुळे ‘नीट’चा अभ्यास करणारे हजारो विद्यार्थी यामुळे तणावात येऊ शकतात. विद्यार्थी येऊ शकतात तणावात

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर