ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मेधा सोमय्या मानहानी खटल्यात संजय राऊतांना दिलासा:शौचालय घोटाळा आरोप प्रकरणात निर्दोष मुक्तता; 15 दिवसांची शिक्षा सत्र न्यायालयात पलटली

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मीरा-भाईंदर शहरातील सार्वजनिक शौचालय बांधकामाच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोमय्या दाम्पत्याने त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. आता सत्र न्यायालयाच्या निर्णयामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या खटल्याचा उगम 2022 मधील मीरा-भाईंदरमधील सार्वजनिक शौचालय प्रकल्पात आहे. शहरात एकूण 154 शौचालये उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यापैकी 16 शौचालयांचे काम मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला देण्यात आले. या कामात सीआरझेड नियमांचे उल्लंघन झाले, बनावट कागदपत्रे सादर करण्यात आली आणि महापालिकेची फसवणूक झाली, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. पर्यावरणाची हानी झाली असल्याचेही त्यांनी म्हटले होते. घाण करून ठेवणारे पुरावे कुठे आहेत असे विचारतील, पण हा घोटाळा युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातूनच झाला, असे वक्तव्य त्यांनी केले होते. हे आरोप सामनातूनही प्रसिद्ध झाले होते. या विधानांनंतर मेधा सोमय्या यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला. माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने यापूर्वी राऊत यांना दोषी ठरवत 15 दिवसांची कोठडी आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. न्यायालयाने त्यावेळी नमूद केले होते की, 15 आणि 16 एप्रिल रोजी केलेली वक्तव्ये बदनामीकारक होती. ही वक्तव्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी ऐकली आणि वर्तमानपत्रांतून वाचली गेली, त्यामुळे याचिकाकर्त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले होते. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 अंतर्गत मानहानी व शिक्षेची तरतूद लागू होते, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. मात्र या शिक्षेविरोधात संजय राऊत यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. प्रकरणातील कागदपत्रे, नोंदी आणि युक्तिवादांचा पुन्हा आढावा घेतल्यानंतर सत्र न्यायालयाने त्यांना दिलासा दिला. सत्र न्यायालयाने दोषारोप टिकत नसल्याचे मान्य करत राऊत यांची निर्दोष मुक्तता जाहीर केली. त्यामुळे दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला निर्णय बाजूला ठेवण्यात आला आहे. या निकालामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबतील का मीरा-भाईंदर शौचालय प्रकरण नेमके काय, यावरही पुन्हा चर्चा रंगली आहे. 2022 मध्ये उभारण्यात आलेल्या 154 सार्वजनिक शौचालयांपैकी 16 शौचालयांचे काम युवा प्रतिष्ठानकडे होते. या कामात महापालिकेची फसवणूक आणि पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावरूनच हा मानहानीचा वाद निर्माण झाला. आता सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर या प्रकरणातील कायदेशीर लढ्याचा एक टप्पा संपला असला, तरी राजकीय आरोप-प्रत्यारोप थांबतील का, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. सोमय्या दाम्पत्य पुढील कायदेशीर पावले उचलणार का, आणि या निर्णयाचा राजकीय परिणाम काय होईल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर