ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दादागिरीच्या रागातून अल्पवयीन मित्रांनीच घेतला मित्राचा जीव:पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात टाकून बुडाल्याचा बनाव

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील भांडुप परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण भाग हादरला आहे. आठवीत शिकणाऱ्या अवघ्या 14 वर्षीय मुलाचा त्याच्याच मित्रांकडून मारहाणीत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह तलावात टाकून बुडाल्याचा बनाव करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी 14 ते 15 वयोगटातील तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. मृत मुलाचे नाव सिद्धार्थ अजय लोंढे (वय 14) असे असून तो भांडुप पश्चिमेकडील तुळशेटपाडा परिसरात कुटुंबासह राहत होता. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे तीन वाजता तो खेळायला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काहीच माहिती न मिळाल्याने आईने पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. अल्पवयीन मुलगा गायब झाल्यामुळे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ मित्रांवर वारंवार दादागिरी करत असल्याची भावना काही मुलांमध्ये होती. त्यातूनच त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याला विहार तलाव परिसरात नेण्यात आले आणि तेथे त्याला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. जखम गंभीर असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी काय करावे हे न समजल्याने मृतदेह तलावात टाकून तो पाण्यात बुडाल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी सुमारे पाच वाजता विहार तलावात एक मृतदेह तरंगताना आढळला. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील तपासासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलांना डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले शवविच्छेदन अहवालात डोक्यावर गंभीर जखमा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर मित्रांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान एका मुलाने गुन्ह्याची कबुली दिली आणि आणखी दोन जण सहभागी असल्याचे सांगितले. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून मारहाणीत वापरलेली लाकडी काठी जप्त केली आहे. पुढील कारवाईसाठी तिन्ही मुलांना डोंगरी येथील बाल निरीक्षण गृहात ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एवढ्या लहान वयातील मुलांनी अशा प्रकारे मित्राचा जीव घेतल्याची बाब धक्कादायक मानली जात आहे. दादागिरीच्या रागातून सुरू झालेला वाद इतका टोकाला जाईल, याची कुणालाही कल्पना नव्हती. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून समाजात वाढत चाललेल्या बालगुन्हेगारीबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर