ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

हवामान:एक आठवडा पाऊस नाही; कोरडे उष्ण वारे वाहणार, पाराही वाढणार, अमरावती सर्वाधिक 46.8, संभाजीनगर 41.7

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची प्रतीक्षा आहे. मात्र, त्याआधीचे दिवस उष्णतेचे असतील. खासगी हवामान संस्था स्कायमेटने मंगळवारी इशारा दिला की पश्चिमी विक्षोभ कमकुवत आहे. सध्या कोणतीही वेदर सिस्टीम येत नाहीये. यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पुढील एक आठवडा कोरडा राहील. दिवस उष्ण राहतील. मेच्या उर्वरित दिवसांत मध्य प्रदेशातील अनेक भागांत होरपळवणारी उष्णता राहील. पारा ४५ अंशांवर जाईल. महाराष्ट्रात मंगळवारी अमरावती सर्वाधिक ४६.८ तापमान होते, तर छत्रपती संभाजीनगरात ४१.७ अंश तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानेही म्हटले की मध्य भारतावर एक विशाल चक्रीवादळ तयार झाले आहे, जे दिल्ली-एनसीआर, यूपी, महाराष्ट्र, गुजरातपर्यंत पसरले आहे.
भास्कर एक्स्पर्ट डॉ. अजय माथूर, ऊर्जातज्ञ; प्राध्यापक, आयआयटी दिल्ली
मानवी शरीरासाठी ३५ अंश वेट बल्ब टेंपरेचर जीवघेणे देशात वेट बल्ब टेंपरेचर घसरून ३५ वर आले आहे. ४० वर्षांपूर्वी ते ४२ अंश होते. म्हणजेच मानवी शरीर जीवघेण्या तापमानाजवळ पोहोचत आहे. गेल्या वर्षी ४० दिवस ते ३१ अंश होते. ५ वर्षांपूर्वी ते २४ दिवस होते. वेट बल्ब टेंपरेचर कमी होत आहे. हे ते किमान तापमान आहे, जिथे शरीर घाम गाळून स्वतःला थंड करू शकते. तापमान ४० अंश आहे, पण हवा कोरडी आहे, तर शरीर घामामुळे स्वतःला वाचवू शकते. पण तापमान ३५ अंश आहे आणि आर्द्रता जास्त आहे तेव्हा शरीराची कूलिंग सिस्टीम फेल होऊ लागते. उन्हात काम करणाऱ्या मजुरांना, हृदय आणि फुफ्फुसांच्या रुग्णांना जास्त धोका आहे. शहरांत घरे एकमेकांच्या इतकी समोरासमोर असतात की एकाची उष्णता दुसऱ्यावर पडते. भिंतीला थंड होण्यासाठी वेळ मिळत नाही. दुसऱ्या दिवशी घरे पुन्हा गरम होतात. रात्रीचे तापमान आता सातत्याने ३० अंशांवर जात आहे, जे धोकादायक आहे. (इको एन एनर्जी टॉकशी झालेल्या संवादात) मान्सून २-३ दिवसांत लक्षद्वीपला पोहोचेल भारतभर पाऊस पाडणाऱ्या नैऋत्य मान्सूनने मंगळवारी कोमोरीन समुद्र, श्रीलंका, बंगालच्या उपसागराचा दक्षिण-पश्चिम भाग यातील आणखी काही भाग व्यापला. तो दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाला आहे. २-३ दिवसांत लक्षद्वीप समूहातील मिनिकॉय बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर