ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

महाराष्ट्रात गॅस टंचाई!:अनेक जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या सिलिंडरसाठी रांगा, पोलिस बंदोबस्तात वितरण सुरू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचे तीव्र पडसाद आता भारतातील उद्योग-व्यवसायांवर उमटू लागले असून, महाराष्ट्रात गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. राज्यातील विविध भागांत घरगुती गॅस मिळवण्यासाठी नागरिक तासंतास लांबच लांब रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत असून, वितरणादरम्यान गोंधळ उडू नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाला अनेक ठिकाणी चक्क पोलिस बंदोबस्त तैनात करावा लागला आहे. मालेगावात सलग दुसऱ्या दिवशी गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, पहाटेपासूनच वितरण केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गॅस उपलब्ध होणार नाही या भीतीपोटी ग्राहकांची झुंबड उडाली असली तरी, महसूल प्रशासन संपूर्ण वितरण व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्रत्येकाला घरगुती गॅस उपलब्ध करून दिला जाईल, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता संयम राखावा, असे आवाहन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नागपुरात भर उन्हात ग्राहकांची गर्दी नागपुरात घरगुती गॅस सिलिंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, प्रशासनाकडून तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र भर उन्हात गोडाऊनबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नुकतीच सिलिंडरची गाडी आल्यामुळे पुरवठा सुरू झाला असला तरी, भविष्यात टंचाई निर्माण होईल या भीतीपोटी नागरिक ‘पॅनिक’ होऊन गर्दी करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, गॅसचा कोणताही तुटवडा नसून केवळ वितरण प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे हा गोंधळ उडत असल्याचे स्पष्टीकरण एजन्सी चालकांनी दिले आहे. भंडाऱ्यातील राईस मिल चालक मोठ्या आर्थिक अडचणीत आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका भंडारा जिल्ह्यातील तांदूळ निर्यातीला बसला असून, यामुळे येथील राईस मिल चालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. आखाती देशांना होणारी तांदळाची निर्यात जवळपास ठप्प झाल्याने उत्पादनात मोठी घट करण्यात आली असून, अनेक राईस मिलमध्ये कामगार कपातही सुरू झाली आहे. परिणामी, हाताला काम नसल्याने अनेक कामगारांसमोर आता पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, जिल्ह्यातील संपूर्ण तांदूळ उद्योग संकटात सापडला आहे. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात ग्राहकांच्या रांगा सातारा जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट करूनही, आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे टंचाई निर्माण होईल या भीतीने नागरिकांनी गॅस एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लावल्या आहेत. साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील इंडेन गॅस एजन्सीबाहेर आज सकाळपासूनच ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली असून, जिल्ह्यात पुढील 10 ते 12 दिवस पुरेल इतका साठा उपलब्ध आहे आणि दररोज 22 हजार सिलिंडरचे वितरण केले जात आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन केले जात असूनही, केवळ भीतीपोटी नागरिक भर उन्हात सिलिंडर घेण्यासाठी झुंबड करत असल्याचे चित्र सद्या जिल्ह्यात दिसत आहे. तसेच कोल्हापूरमध्ये देखील नागरिकांनी रांग लावल्याचे पाहायला मिळाले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर