ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

आपबिती… पाणी पिण्यासाठी बाहेर आले म्हणून माझा जीव वाचला:निष्पाप कामगारांचा बळी सुरक्षा मानके पाळली नसल्यानेच स्फोट

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कमी पगार आणि सुरक्षेचा अभाव अशा दुहेरी संकटात काम करणाऱ्या ग्रामीण महिलांच्या आयुष्याचा खेळ मांडणाऱ्या स्फोटक कंपनीत भीषण दुर्घटना घडली. राऊळगाव, डोर्ली आणि वलनी परिसरातील महिला जेथे अवघ्या १३ ते २० हजार रुपयांसाठी मृत्यूच्या छायेत काम करतात तिथे झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला आहे. “पाणी पिण्यासाठी बाहेर आले म्हणून जीव वाचला,” अशा शब्दांत रोशनी मसरामने आपली आपबीती सांगितली, मात्र त्यांच्यासोबतच्या अनेक मैत्रिणींना या मृत्यूने कवटाळले. संरक्षणतज्ज्ञांच्या मते, जिलेटीन आणि डिटोनेटर्स हाताळताना आवश्यक असलेली ‘वाळूची पोती’ आणि इतर सुरक्षा मानके पाळली नसल्यानेच हा स्फोट झाला असावा. धक्कादायक बाब म्हणजे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी वारंवार सेफ्टी ऑडिटची मागणी करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला. कंपनी म्हणते, उत्पादन कार्य सुरू नव्हतेच ही घटना घडली त्या पॅकिंग युनिटमध्ये त्या वेळी कोणतेही सक्रिय उत्पादन कार्य सुरू नव्हते. नेमके कारण अद्याप तपासाधीन आहे. आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत असे कंपनीने म्हटले आहे. सेफ्टी ऑडिटकडे दुर्लक्ष केल्याने अपघात- देशमुख सर्वच स्फोटके कंपनीचे सेफ्टी ऑडिट करण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री, पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना व संबंधित विभागाकडे पत्र लिहून केली होती. परंतु याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. तीस वर्षांत असे कधी पाहिले नाही – मंदा कोटरंगे मंदा कोटरंगे या आॅरेंज सिटी हाॅस्पिटलमध्ये आया म्हणून काम करतात, तर दिनेश शेंडे हे मदतनीस आहेत. कोटरंगे गेल्या ३० वर्षांपासून येथे काम करतात. आम्ही नेहमी परमाणे कामावर होतो. सकाळी ८.१५ च्या सुमारास सूचना मिळाली. आणि ८.३० वाजेच्या सुमारास रुग्णवाहिकेतून रुग्ण येणे सुरू झाले. त्यांचे हाल पाहवत नव्हते. गेल्या ३० वर्षांत इतकी भयानक घटना पाहिली नाही. रुग्णवाहिकेतून स्ट्रेचरवर घेऊन नेण्याची हिंमत होत नसल्याचे त्या म्हणाल्या. नवीन कामगारांना केवळ साडेतेरा हजार रुपये वेतन या धोकादायक कंपनीत काम करणाऱ्या कामगार महिला परिसरातीलच राऊळगाव, डोर्ली, मेटपांजरा, वलनी, काटोल देशमुख या गावातील आहेत. येथे नवीन कामगारांना साडेतेरा हजार पगार मिळतो, तर जुन्या कामगारांना १७ ते २० हजारांपर्यंत वेतन मिळते. मात्र कंपनीकडून त्यांच्या सुरक्षेकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. व्यवस्थापन कारणीभूत सेफ्टीसाठी कामगार जिलेटीन तयार करण्यासाठी खाली बसल्यानंतर त्याच्या उंचीएवढी रेतीने भरलेली पाेती त्याच्या मागे ठेवावी लागतात. तिथे वाळू पोेती ठेवलेली नव्हती. यात व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा दिसून येतो. -अभय पटवर्धन, निवृत्त कर्नल संरक्षणतज्ज्ञ एका युनिटमध्ये असतात साधारणपणे ३० कामगार एका युनिटमध्ये साधारणपणे ३० कामगार असतात. त्यापैकी २० मशीनवर आणि १० डिटोनेटर्सच्या काउंटिंगसाठी असतात. घटनेच्या वेळी रोशनी मसराम या पाणी पिण्यासाठी बाहेर आल्या होत्या म्हणून वाचल्या. त्यांच्यासोबत दररोज येणे-जाणे करणाऱ्या वर्षा टेकाम या मात्र मृत्युमुखी पडल्याचा मानसिक धक्का त्यांना बसला. आत नेमके काय झाले हे सांगू शकत नाही.
स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला. यात अनेक जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर