वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील वेगाव येथे २० वर्षीय शेतकरी पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ३० जून) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृत युवकाचे नाव विश्वास उर्फ सिद्धांत व्यासनाथ मत्ते (वय २०, रा. वेगाव, ता. मारेगाव) असे आहे. त्यांच्या कुटुंबाकडे सुमारे चार … Read more

मार्डा डॅम हत्या प्रकरणात आणखी दोन आरोपी जेरबंद

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दंडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरात आढळून आलेल्या ४५ ते ५० वर्षीय अनोळखी व्यक्तीच्या हत्या प्रकरणाचा छडा लावत मारेगाव पोलिसांनी अवघ्या २४ तासांत तीन आरोपींना अटक केली होती. त्यानंतरही या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असल्याचा संशय कायम ठेवत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. अखेर … Read more

कत्तलीसाठी नेली जात असलेली गोवंश जनावरे पकडली; एक गाय मृतावस्थेत, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल प्रमोद रा. मेश्राम, मारेगाव तालुका प्रतिनिधी मारेगाव पोलिसांनी अंबेझरी शिवारात धाडसी कारवाई करत कथितरीत्या अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत असलेली गोवंश जनावरे ताब्यात घेतली. या कारवाईत एका गायीचा मृत्यू झाल्याचे आढळून आले असून जिवंत जनावरे व वाहनासह सुमारे ३ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन … Read more

जळका शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील जळका शिवारातील रोडलगत असलेल्या शेताजवळील नालीत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ परचाके यांच्या शेताजवळील नालीत अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. मृत व्यक्तीचे अंदाजे वय ४५ ते ५० वर्षे असून … Read more

24 तासांत अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खूनप्रकरणाचा छडा; तिघांना अटक

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून खूनप्रकरणाचा छडा लावत तिघा संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळविले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्हा पोलिस दलाच्या तपास कौशल्याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 5 जून रोजी दांडगाव शिवारातील मार्डा डॅम परिसरातील जंगलात गौतम ठमके यांच्या शेतालगतच्या … Read more

मारेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई

12 हजारांचा मोहफुलांचा सडवा जप्त, एकावर गुन्हा प्रमोद रा.मेश्राम मारेगाव तालुका प्रतिनिधी मारेगाव, दि. 4 जून अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात मारेगाव पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत ग्राम सोनुपोड (सराटी) परिसरात छापा टाकून मोहफुलांच्या सडव्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत सुमारे 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा … Read more

सख्ख्या भावानेच केला भावाचा घात

देवाळा येथे भावावर फावड्याने हल्ला; एक गंभीर जखमी सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे सख्ख्या भावाने मोठ्या भावावर फावड्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून … Read more

पार्डीत शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : तालुक्यातील पार्डी येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवार (दि. 21 एप्रिल 2026) रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. मृत शेतकऱ्याचे नाव कैलाश चंद्रभान गाडगे (वय 55, रा. पार्डी, ता. मारेगाव, जि. … Read more

मारेगावात धाडसी घरफोडी : चोरट्यांचा डाव साधला

जुन्या किमती प्रमाणे साडेतीन लाखांचा ऐवज लंपास सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव शहर पुन्हा एकदा घरफोडीच्या घटनेने हादरले असून, वार्ड क्रमांक १४ मध्ये अज्ञात चोरट्यांनी साधलेल्या डावामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भरदिवसा घराला केवळ कुंडी लावल्याचा फायदा घेत चोरट्यांनी थेट घरात प्रवेश करून सोन्या-चांदीसह रोख रक्कम असा तब्बल अंदाजे जुन्या किंमती प्रमाणे ३ … Read more

सराटीत महिलांचा एल्गार

अवैध दारूविक्रीविरोधात थेट कारवाई प्रशासनाला ५ दिवसांचा अल्टिमेटम सुरेश पाचभाई, मारेगाव मारेगाव तालुक्यातील सराटी गावात अवैध दारूविक्रीविरोधात महिलांनी आज जोरदार एल्गार पुकारत थेट कारवाईचा मार्ग अवलंबला. बुधवारी (दि. ९ एप्रिल) सकाळी साडेनऊच्या सुमारास महिलांनी एकत्र येत गावातील संशयित अवैध दारू विक्रेत्याच्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणात ‘पोवे’ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे … Read more

error: Content is protected !!