ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत.‎ प्रशासनाकडे पिण्याच्या‎ पाण्यासाठी टँकर्सची मागणी ‎वाढली आहे. सद्यःस्थितीत बीड‎आणि धाराशिव हे दोन जिल्हे‎ वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये टँकर‎ सुरू केले आहेत. विभागीय‎ आयुक्तालयाच्या २९ एप्रिलच्या‎ अहवालानुसार, मराठवाड्यातील‎ छत्रपती संभाजीनगर, जालना‎ आणि लातूर या तीन जिल्ह्यांतील‎ तहानलेली ६३ गावे आणि २६‎वाड्यांना पाणी पुरवठा‎ करण्यासाठी १०६ टँकर्स धावत‎ आहेत. यात ४ शासकीय तर १०२‎ खासगी टँकर्सचा समावेश आहे.‎ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात‎टंचाईची झळ सर्वाधिक असून,‎४५ गावे आणि १२ वाड्यांसाठी‎तब्बल ७३ टँकर्स सुरू आहेत.‎जालना जिल्ह्यातील १६ गावे आणि‎१३ वाड्यांची तहान भागवण्यासाठी‎३१ टँकर्स (२ शासकीय व २९‎खासगी) धावत आहेत. लातूर‎जिल्ह्यातील २ गावे आणि १‎वाडीसाठी २ शासकीय टँकर्स सुरू‎आहेत. मराठवाड्यातील अन्य‎जिल्हे सध्या टँकरमुक्त आहेत.‎ गतवर्षीच्या तुलनेत यंदा टँकर निम्मे मागील वर्षी (२०२५‎मध्ये) मार्च महिना संपण्यापूर्वीच अनेक भागांत टँकर सुरू करावे लागले‎होते. २० ते २२ एप्रिल २०२५ दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड‎आणि लातूर या चार जिल्ह्यांतील १४२ गावे व २४ वाड्यांना तब्बल २१५‎टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. सुदैवाने, यंदा चांगल्या पावसामुळे‎गतवर्षीच्या तुलनेत टँकर्सची संख्या निम्म्याहून कमी (१०६) आहे.‎ बीड, धाराशिवला यंदा‎ टंचाईतून मिळाला दिलासा‎ संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता आणि टँकर‎भरण्यासाठी लागणारे पाणी लक्षात घेऊन‎प्रशासनाने मराठवाड्यातील बीड आणि‎धाराशिव वगळता इतर सर्व जिल्ह्यांतील‎खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यास सुरुवात‎केली आहे. आतापर्यंत एकूण १५४ खासगी‎विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर