हुमणी अळी व्यवस्थापनासाठी प्रकाश सापळा वापरा: कृषि विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यात गावा गावांमध्ये खरीपपूर्व नियोजन व हुमणी अळी व्यस्थापन बाबत सभा घेऊन शेतकऱ्यांना एकात्मिक पिक व्यवस्थापनाबाबत जागृती निर्माण करण्याची मोहीम सुरू आहे. मागील वर्षी तालुक्यात तुरळक ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला होता, यावर्षीही काही ठिकाणी हुमणी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रकाश सापळा वापरण्याचे … Read more

तालुक्यात शेतीशाळांचा धडाकेबाज शुभारंभ

आधुनिक तंत्रज्ञान, नैसर्गिक शेती आणि हवामान अनुकूल पद्धतींचे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष धडे सुरेश पाचभाई | मारेगाव मारेगाव बदलत्या हवामानाच्या आव्हानांवर मात करत शेती उत्पादनात वाढ घडवून आणण्यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या पुढाकाराने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतीशाळा अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ ४ जून रोजी वडगाव व हिवरा मजरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात … Read more

रोहिणी नक्षत्राचा शुभसंकेत!

मारेगाव तालुक्यात शेतकऱ्यांची लगबग वाढली; खरीप हंगामाच्या तयारीला वेग सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यात रोहिणी नक्षत्र लागताच शेतकऱ्यांच्या कामांना चांगलाच वेग आला असून संपूर्ण शिवारात खरीप हंगामाच्या तयारीची धामधूम पाहायला मिळत आहे. मृग नक्षत्राच्या आगमनापूर्वीच शेतकरी नांगरणी, वखरणी, बांधबंदिस्ती आणि शेती मशागतीच्या कामात गुंतलेले दिसत आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत शिवारात ट्रॅक्टरचा आवाज घुमत असून शेतकरी नव्या … Read more

पावसाळ्यापूर्वी शेतीकामांना वेग

मारेगाव तालुक्यात मे महिन्यात शेतकऱ्यांची लगबग वाढली सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीकामांना चांगलाच वेग आला आहे. मे महिन्याच्या कडक उन्हातही शेतकरी सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात राबताना दिसत असून नांगरणी, वखरणी, बांध दुरुस्ती, शेतसाफसफाई आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.तालुक्यात अनेक ठिकाणी ट्रॅक्टरद्वारे नांगरणीची कामे सुरू असून … Read more

आर्थिक समृद्धी साठी शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी

कृषि विभागाचे आवाहन सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील वाढत्या सुविधा सिंचन सुविधा पाहता शेतकऱ्यांनी आपल्या शेतात फळबाग लागवड करून शाश्वत उत्पन्नाकरिता फळबागांची लागवड करावी असे आवाहन तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी केले आहे. तालुका कृषि अधिकारी कार्यालय मारेगाव मार्फत शंभर टक्के अनुदानावर आंबा, मोसंबी, संत्रा, पेरू, सीताफळ, फणस, चिकू ,लिंबू व इतरही फळपिके लागवड … Read more

पिकांचे अवशेष बारीक करून शेतातच कुजविण्याची मोहीम

कृषि विभागाचा पुढाकार सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाचे क्षेत्र असून कापूस काढणीनंतर पऱ्हाट्या उपटून जाळून टाकण्याची प्रथा सर्वसाधारणपणे दिसून येते. मात्र या पऱ्हाट्या बारीक करून जमिनीत मिसळल्यास उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होत असल्याने कृषि विभागाच्या वतीने पिकांचे अवशेष शेतातच कुजविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून … Read more

‘एक गाव, एक कृषी अवजारे बँक’ योजनेसाठी महिला बचत गटांना सुवर्णसंधी

५ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करा सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव:गावपातळीवर कृषी यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘एक गाव, एक कृषी अवजारे बँक’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी महिला शेतकरी बचत गटांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिला बचत गटांनी ५ एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन तालुका कृषी … Read more

महा विस्तार AI अ‍ॅप’ नोंदणीसाठी मारेगाव कृषी विभागाचे आवाहन

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: महाराष्ट्र शासनाच्या वतीने शेतकरी, युवक तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या *‘महा विस्तार AI अ‍ॅप’*ची नोंदणी मोहीम सध्या राज्यभर राबविण्यात येत असून, मारेगाव तालुक्यातील कृषी विभागाने नागरिकांना या अ‍ॅपवर जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कृषी, रोजगार, प्रशिक्षण तसेच विविध शासकीय योजनांची माहिती एकाच अ‍ॅपद्वारे उपलब्ध करून … Read more

बोटोणी येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा व गलितधान्य योजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न

सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव तालुक्यातील बोटोणी येथे दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी जगन्नाथ मंदिर सभागृहात तालुका कृषी अधिकारी कार्यालय, मारेगाव यांच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा व गलितधान्य योजनेंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले व मंडळ कृषी अधिकारी श्री. किशोर डोंगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. प्रशिक्षणात शेतकऱ्यांना … Read more

प्रशिक्षणातून फळबाग व बांबू लागवडीसाठी प्रबोधन

कृषि विभागाचा उपक्रम सुरेश पाचभाई मारेगाव मारेगाव: तालुक्यातील वेगाव (मठ) येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले. कृषि विभागामार्फत आयोजित या शेतकरी प्रशिक्षणात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रगतीशील शेतकरी कैलास डोंगरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कृषि विभागाच्या विविध योजना, महाविस्तार AI app व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी … Read more

error: Content is protected !!