ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

बच्चू कडू शिवसेनाचा धनुष्यबाण हाती घेणार:म्हणाले- ‘प्रहार’ कायम राहणार; रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी तितकाच दिव्यांग, शेतकऱ्यांसाठी धावणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहोत, अशी भूमिका बच्चू कडू यांनी आज सकाळीच माध्यमांशी बोलताना जाहीर केली होती. आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. आमचे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहोत, असे बच्चू कडू यांनी म्हटले. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्याकडून शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला जाण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. गेल्या दोन दिवसांपासून बच्चू कडू शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगताना दिसली. आता त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. नेमके काय म्हणाले बच्चू कडू? बच्चू कडू म्हणाले, आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण शेतकरी, मजूर, दिव्यांगांसाठी हाती घेणार आहोत. काल परवा ज्या चर्चा झाल्या, आमचे सगळे मुद्दे शिवसेनेने स्वीकारले आहेत. पेरणी ते कापणीपर्यंत सगळी कामे एमआरजीएसमध्ये घ्यावे, हमीभावात सुधारणा करण्यासाठी लढण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींमधील विधवा बहिणी तशाच कोरड्या आहेत. शिंदे साहेबांनी दिव्यांगांचे मंत्रालय स्थापन केले, मात्र त्याचे बळकटीकरण झाले नाही. हे सगळे मुद्दे मान्य झाल्यानंतरच धनुष्यबाण हाती घेण्याचा निर्णय घेत आहे, अशी घोषणा प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केली आहे. कोणताही समझोता नाही शिवसेनेची राजकीय ताकद मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू. पण त्याबदल्यात आम्हाला शेतकऱ्याची, दिव्यांगांची ताकद हवी आहे. त्याबद्दल कुठलीही तडजोड होणार नाही, असेही बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात दिव्यांग मंत्रालय उभे राहिले असेल, तर त्याच्या बळकटीकरणासाठी प्रयत्न झाला पाहिजे. शेतकऱ्याच्या लढाईत एक इंचही फरक पडणार नाही. प्रहार सामाजिक संघटना आणि प्रहार दिव्यांग संघटना काय राहणार. मात्र पूर्ण ताकदीने शिवसेना कशी वाढेल? त्यासाठी माझ्या अंगातील रक्ताचा प्रत्येक थेंब जितका पक्षासाठी धावणारा आहे, तितकाच माझ्या मजूर, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी धावणार आहे. त्यांच्यासाठी कोणताही समझोता होऊ शकत नाही, असेही बच्चू कडू यांनी निक्षूण सांगितले. पुन्हा एकदा ‘घरवापसी’ आम्ही आमच्या राजकीय प्रवासाची शिवसेनेतून सुरुवात केली होती. माझ्या अजूनही बाळासाहेब ठाकरेंना शेतकरी कर्जमाफी संदर्भात लिहिलेले पत्र आहे. कापासाच्या भावासंदर्भात आम्ही राजीनामा दिला होता. आता पुन्हा शेतकऱ्यांचे आणि दिव्यांगांचे मुद्दे घेऊन आम्ही शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेत आहोत. हा धनुष्यबाण माझ्या शेतकरी, मजूर, वंचित घटकांच्या, दिव्यांगांसाठी कसा कामी येईल? तो उचलण्याचा प्रयत्न करू, असे बच्चू कडू म्हणाले. मला मंत्रिपद हवे असते तर… बच्चू कडू म्हणाले की, मला मंत्रीपदाचे काही नाही, मला काही मागायची सवय नाही, मला मंत्रीपद हवे असवे तर गुवाहाटीला गेलो होतो, तेव्हाच मागितले असते. लोक मंत्रीपदासाठी फिंल्डींग लावत होती, पण मी दिव्यांग मंत्रालयासाठी भांडत होतो, हाच फरक आहे बच्चू कडूचा हे समजून घ्या. बच्चू कडू म्हणाले, आता जे घडतंय ते माझ्या ध्यानीमनी देखील नव्हते, मला काहीच माहिती नव्हती, मी संत्र्याला पाणी देत होतो, तुमच्या बातम्या आल्या सुत्रांनी सांगितले. फोन केला हे केले, इथपर्यंत मी येण्याचे श्रेय मी माध्यमांना देतो, विधान परिषद माझ्या कानावर देखील नव्हती, हे कानावर टाकण्याचे काम माध्यमांनी केले. सामाजिक काम करणाऱ्यांसाठी प्रहार राहील बच्चू कडू म्हणाले की, २४ तासात एकनाश शिंदेंसोबत शेतकऱ्यांच्या हमीभावावर चर्चा झाली, पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, ते होत असेल तर काय? संघटना या काळात चालवणे फार कठिण आहे, कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणे माझे काम आहे. जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा. प्रहार संघटना राहील, ज्याला सामाजिक काम करायचे आहे, त्यासाठी प्रहार राहील. ‘रॉबिनहूड’नेता म्हणून ओळख बच्चू कडू यांनी दिव्यांग, शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा ‘रॉबिनहूड’नेता म्हणून वेगळी ओळख आहे. त्यांच्या ‘प्रहार’ संघटनेकडून नेहमी सामाजिक कार्य सुरू असते. अमरावती जिल्ह्यातला अचलपूल विधानसभा मतदार संघ त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून ओळखला जातो. त्यांचे पूर्ण नाव ओमप्रकाश बाबाराव कडू असून अमरावती जिल्ह्यातल्या बेलोरा गावात एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दिव्यांग, अंध आणि अपंगांसाठी त्यांनी केलेले काम आणि वेगवेगळ्या धाटणीचे आंदोलने कायम चर्चेत असतात. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये काही काळ राज्यमंत्री म्हणून काम केले. त्यांच्या इरसाल आणि ओघवत्या शैलीतल्या भाषणांना उत्तम प्रतिसाद मिळतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर