ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका:हा षडयंत्राचा काळ, धनंजय मुंडे यांचे दमानियांना हिनवणाऱ्या आपल्याच समर्थकांना खडेबोल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यातील कथित घोटाळ्याप्रकरणी दिलासा मिळाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर टीका करणाऱ्या आपल्या समर्थकांना खडेबोल सुनावलेत. न्याय मिळाला म्हणून इतरांना हिणवू नका. हा षडयंत्राचा काळ आहे, असे ते म्हणालेत. मुंबई उच्च न्यायालायने धनंजय मुंडे यांना 2024 च्या कृषी विभागाच्या खरेदी – विक्री व्यवहाराशी संबंधित एका प्रकरणात क्लीनचिट दिली होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या क्लीनचिटला लोकायुक्तांकडे आव्हान दिले होते. लोकायुक्तांनीही सोमवारी मुंडे यांना दिलासा देत दमानिया यांची तक्रार धुडकावून लावली आहे. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कोणताही निर्णय देऊ शकत नाही, असे म्हणत लोकायुक्तांनी हे प्रकरण निकाली काढले. यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अंजली दमानिया यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. हा षडयंत्राचा काळ – धनंजय मुंडे धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी यासंबंधी केलेल्या अनेक पोस्ट अंजली दमानिया यांनी सार्वजनिक केल्या. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया आल्या. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या समर्थकांचे कान टोचलेत. ते मंगळवारी या प्रकरणी एका पोस्टद्वारे म्हणाले, प्रत्येकाला आपल्या उद्दिष्ट आणि हेतूप्रमाणे कृती करण्याचा अधिकार आहे. आपण आपल्या परीने न्याय-दाद मागण्याच्या प्रक्रियेतून जात आहोत. अश्या परिस्थितीत आपल्याला न्याय मिळाला म्हणून कोणीही इतरांना हिणवू नये. हा षडयंत्रांचा काळ आहे. आपल्यापैकी अनेकांच्या अश्या भावनिक व अविचारी कृतीमुळे आपल्याविरुद्ध षडयंत्र करणाऱ्यांना अधिक बळ मिळते, हे लक्षात घ्या. शेवटी संयम सर्वात महत्त्वाचा, असे ते म्हणालेत. काय होती अंजली दमानियांची तक्रार? अंजली दमानियांनी लोकायुक्तांकडे सादर केलेली तक्रार 2 गंभीर मुद्यांवर आधारित होती. 1) कृषी खरेदी घोटाळा संदर्भात महाराष्ट्र कृषी विभागामार्फत पाच प्रकारच्या कृषी साहित्य व खतांची खरेदी बाजारभावाच्या जवळपास दुप्पट दराने आणि अत्यंत मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता. या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या संदर्भात मी संबंधित साहित्य खुल्या बाजारातून अत्यल्प प्रमाणात व निम्म्याहून कमी दराने खरेदी करून त्याचे पुरावे लोकायुक्त कार्यालयासमोर सादर केले होते, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. 2) ‘ऑफिस ऑफ प्रॉफिट’ व राख प्रकरण धनंजय मुंडे व त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या मालकीच्या तीन कंपन्या फ्लाय अॅश व्यवसायात कार्यरत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या कंपन्यांमार्फत बॉटम अॅशची अफरातफर (siphoning) होत असल्याचा आरोप तक्रारीत नमूद केला होता. या संदर्भात Maharashtra State Power Generation Company Limited (महाजेनको) यांनी बीड येथील पोलीस अधीक्षकांकडे दाखल केलेल्या 40 तक्रारींची यादीही सादर करण्यात आली होती. राजकीय दबावामुळे या कोणत्याही एफआयआरवर कारवाई झालेली नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते, असेही त्या या प्रकरणी म्हणाल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर