ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

राऊतांच्या विजयाने बार्शीच्या विकासाला-राजकारणाला मिळेल नवी दिशा:स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निर्विवाद वर्चस्व स्थापन केले तेव्हाच रचला पाया

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बार्शी सोलापूर विधान परिषद निवडणुकीतील विजयाने बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत दमदार एंट्री केली असून, यामुळे बार्शी तालुक्याच्या विकासाला गती मिळेल. तर बार्शीच्या राजकारणावरही याचा परिणाम होणार असून, आता विधानसभेसाठी कोण? असा नवा प्रश्न समोर आला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर राऊत यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पुन्हा राजकीयदृष्ट्या सक्रिय केले. आगामी सर्व निवडणुका जिद्दीने लढण्याचा आत्मविश्वास दिला आणि याच टप्प्यापासून राऊत यांच्या नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाली. राऊत यांनी जोमाने कामाला लागत बाजार समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळवून दिले. या विजयांमुळे विधानसभा निवडणुकीतील पराभव हा केवळ राजकीय अपघात होता, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. बार्शी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी क्षेत्रातील वाढत्या प्रभावामुळे त्यांची राजकीय ताकद अधिक वाढली. हे यश भाजपच्या शीर्ष नेतृत्वाच्या नजरेत भरण्याजोगे होते. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्ह्यातील विश्वासू सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांतील सलग यश, पक्ष संघटनेवरील पकड आणि तालुक्यातील प्रभाव याच्या बळावर भाजपने त्यांना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी दिली. महायुतीच्या संख्याबळामुळे त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता. मात्र, राऊत यांनी केवळ महायुतीची मते कायम राखली नाहीत, तर विरोधातील काही हक्काची मतेही आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले. तब्बल ३६५ मतांच्या मताधिक्याने मिळालेला हा विजय पालकमंत्री गोरे व राऊत यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाची साक्ष देणारा ठरला. या विजयाने राऊत यांचे स्थान केवळ बार्शीपुरते मर्यादित राहणार नसून संपूर्ण सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचे वजन वाढणार आहे. संपूर्ण जिल्हा हा त्यांचा मतदारसंघ असल्याने जिल्हाभर त्यांचा संपर्क वाढेल. राऊत यांच्यासमोर विकासकामांचे आव्हान विजयानंतर अपेक्षांचे ओझेही वाढले आहे. बार्शीतील एमआयडीसीमध्ये मोठे उद्योग आणणे, बार्शी व वैराग परिसरात नव्या औद्योगिक विकासाला चालना देणे, बार्शी शहराच्या पाणीपुरवठा योजनेला गती देणे, रोजगारनिर्मिती वाढवणे ही महत्त्वाची आव्हाने त्यांच्या समोर उभी आहेत. २०२९ च्या विधानसभेला कोण? आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार कोण असणार? याची चर्चा सुरू झाली आहे. येथील पारंपरिक राजकीय विरोधक सोपल व राऊत यांच्या कुटुंबातील नवे शिलेदार मैदानात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. राजकारणात नवा अध्याय विधान परिषद निवडणुकीतील विजयाने राजेंद्र राऊत यांनी केवळ राजकीय पुनरागमन केले नाही, तर बार्शी आणि जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले आहे. पराभवाच्या नैराश्यातून उभारी घेत त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय ताकद सिद्ध केली असून, बार्शीसह जिल्ह्याच्या राजकारणाला आणि विकासाला ते नवी दिशा देतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर