ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

मला शंभर टक्के खात्री होती डॉक्टर साहेबांनी खून केला नव्हता:पद्मसिंह पाटलांच्या सुटकेनंतर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या ऐतिहासिक निकालानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांची जाहीर पाठराखण केली आहे. “मला १०० टक्के खात्री होती की डॉक्टर साहेबांनी हा खून केला नव्हता,” असे म्हणत आव्हाडांनी न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत केले आहे. पहिला निकाल महत्त्वाचा असतो
न्यायालयाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मला सुरुवातीपासूनच शंभर टक्के खात्री होती की डॉक्टर साहेबांनी हा खून केला नव्हता. आज कोर्टाचा निकाल लागला, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. कोणत्याही कायदेशीर लढाईत जो पहिला निकाल असतो, तो अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. स्वीकृत दर्शनी पहिल्या निकालात काय आलं? तर डॉ. पद्मसिंग पाटील निर्दोष मुक्त झाले आहेत, हेच सर्वात महत्त्वाचे आहे.” डॉ. पाटील यांच्या सुटकेमुळे निंबाळकर-पाटील कुटुंबातील या दोन दशकांच्या वादाला तूर्तास एक वेगळे वळण मिळाले आहे. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
डॉ. पद्मसिंह पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते असून ते शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि नातेवाईकही आहेत. त्यामुळे पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येनंतर जेव्हा पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप झाले, तेव्हा संपूर्ण राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. आज सीबीआय कोर्टाने त्यांना सर्व आरोपांतून मुक्त केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने दिलेली ही ‘क्लीन चिट’ आणि व्यक्त केलेला आनंद आता राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. संबंधित बातम्या वाचा…
पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास यंत्रणा, पोलीस आणि सीबीआयच्या अत्यंत ढिसाळ कारभारावर प्रचंड कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या ‘माफीच्या साक्षीदारावर’ उभा होता, त्यालाच न्यायालयाने अविश्वसनीय आणि सोयीनुसार खोटे बोलणारा ठरवले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्रमांक ५५ मध्ये पार पडलेल्या या सुनावणीतील १० सर्वात मोठे खुलासे आणि कोर्टाची सविस्तर निरीक्षणे येथे वाचा संपूर्ण बातमी ऑपरेशन टायगर संकटात:ओमराजे म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही, मतदारसंघात जावून चर्चा करून पुढचे ठरवणार! ‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर संकटात आल्याचे बोलले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी पवनराजे हत्याकांड प्रकरणी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडमध्ये:थेट गृहमंत्री अमित शाहांशी चर्चा; CBI हायकोर्टात जाणार पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या काही तासांतच आता देशपातळीवर मोठ्या राजकीय आणि कायदेशीर घडामोडींना वेग आला आहे. या खटल्यातील माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींच्या निर्दोष मुक्तीच्या निकालाविरोधात केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) वरिष्ठ न्यायालयात (हायकोर्टात) अपील करणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणी सीबीआयला थेट दाद मागण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सविस्तर वाचा

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर