ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

गोवंडीत 3 तर कुर्ल्यात 1 ठिकाणी एटीएसची छापेमारी:4 संशयित ताब्यात, दहशतवादी कनेक्शनचा संशय

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असतानाच मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंबईतील कुर्ला आणि गोवंडी या अत्यंत गर्दीच्या ठिकाणांवर छापेमारी करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसने मुंबईत एकूण चार ठिकाणी छापे टाकले. यामध्ये गोवंडीतील तीन आणि कुर्ल्यातील एका ठिकाणाचा समावेश आहे. या कारवाईदरम्यान चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचा दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. मोबाईल, लॅपटॉपसह इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त दहशतवादी संघटनेच्या कथित ऑनलाइन प्रचारासंदर्भात ही छापेमारी करण्यात आली. सोमवारी संध्याकाळी सुरू झालेली ही मोहीम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होती. या शोधमोहिमेत एटीएसने मोबाईल फोन, लॅपटॉप आणि अनेक महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. अनेक संशयितांची सध्या कसून चौकशी केली जात आहे. ISIS शी कनेक्शन असल्याचा संशय काही व्यक्ती डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करून कट्टरपंथी विचारांचा प्रसार करत असल्याचे इनपुट्स केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून मिळाले होते. विशेषतः एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप्सद्वारे ‘आयसिस’ (ISIS) या प्रतिबंधित संघटनेची विचारसरणी पसरवली जात असल्याचा संशय आहे. ताब्यात घेतलेल्या तरुणांचे या संघटनेशी संबंध असल्याचे सबळ पुरावे एटीएसच्या हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तपासाची व्याप्ती वाढणार हे संशयित केवळ कट्टरपंथी सामग्री पाहत होते की नवीन तरुणांची भरती करण्याच्या मोहिमेत सक्रिय होते, याचा शोध सध्या घेतला जात आहे. या प्रकरणाचे कनेक्शन थेट परदेशातील हँडलर्सशी असण्याची शक्यता आहे. एटीएसने अद्याप अधिकृत अटक जाहीर केली नसली तरी, आगामी काळात मुंबईसह राज्यातील इतर शहरांमध्येही अशाच प्रकारची मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर