ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे माकड केले:मोदींची दुखरी नस ट्रम्प यांच्या हाती लागली, त्यामुळेच ते त्यांना नाचवत आहेत – प्रकाश आंबेडकर

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माकड केल्याची अत्यंत जहरी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती पंतप्रधान मोदींची एखादी दुखरी नस लागली आहे. त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत, असे ते म्हणालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रातील रालोआ सरकारने अमेरिकेशी एक व्यापार करार केला आहे. विरोधकांनी या करारावर टीका करत या करारामुळे सरकारने भारतीय शेतकऱ्यांचे भवितव्य अमेरिकेच्या भरवशावर सोडल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना माकडासारखे आपल्या तालावर नाचवत असल्याचा आरोपही केला आहे. मोदी पीएम मोदींना माकडासारखे नाचवत आहेत प्रकाश आंबेडकर म्हणाले, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाला पूर्णतः उद्ध्वस्त करत आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माकड बनवून ठेवले आहे. मोदी ट्रम्प सांगतील तेच करतात. रशियाकडून तेल खरेदी करायचे नाही, तर करायचे नाही. भारतीय कृषी सेक्टर अमेरिकेसाठी उघडायचे, तर उघडले. आतापर्यंत टेक्स्टाईलवर टेरिफ2.5 टक्के होता. तो आता 18 टक्के झाला आहे. मोदी ही चांगली गोष्ट असल्याचा दावा करत आहेत. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एखादी दुखरी नस डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाती लागली आहे. त्यामुळेच ते त्यांना आपल्या तालावर नाचवत आहेत. हे सर्व सार्वजनिक हिताचे विषय आहेत आणि या सर्व गोष्टी देशासाठी अपमानजनक आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र लिहून मी विरोधी पक्षांची एक बैठक बोलावून या मुद्यावर देशव्यापी आंदोलन करण्याची मागणी केली आहे, असे ते म्हणाले. मोदींकडून धर्म व जातव्यवस्था पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न काँग्रेस संसदेत जे करत आहे ती चांगली गोष्ट आहे. पण या सर्वसामान्य जनतेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे या प्रकरणी देशव्यापी आंदोलन करण्याची गरज आहे. या देशातील मध्यम वर्ग व सवर्ण समाजातून एक असा वर्ग उदयास येत आहे, जो पंतप्रधान मोदी धर्म व जातव्यवस्था पुन्हा जिवंत करत असल्याचा व त्याचे महत्त्व वाढवत असल्याचा आरोप करत आहे. आपण त्याची मदत केली पाहिजे. देश सर्वप्रथम व त्यानंतर इतर गोष्टी आहेत. या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी देशव्यापी आंदोलन छेडण्याची गरज आहे. राहुल गांधी व मल्लिकार्जुन खरगे या प्रकरणी योग्य तो विचार करतील असा मला विश्वास आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर