ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

राऊत आधी आपले नगरसेवक सांभाळा, मग इराणवर बोला:भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून जागतिक राजकारणाचे सल्ले देऊ नका- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली परदेशात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असताना, संजय राऊत मात्र निराधार टीका करत आहेत. स्वतःच्या पक्षाचे नगरसेवक आणि राज्यसभेचे उमेदवार ठरवताना नाकीनऊ येणाऱ्या राऊतांनी आंतरराष्ट्रीय विषयांवर भाष्य करणे म्हणजे ‘सूर्यावर थुंकण्यासारखे’ आहे, अशा शब्दांत भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांना राज्यसभेचा एक उमेदवार ठरवण्यासाठी महिनाभराचा वेळ लागतो, अशी टीका करत बन म्हणाले की, ज्यांना नगरसेवक सांभाळता येत नाहीत आणि स्वतःच्या पक्षाचे निर्णय घेताना दमछाक होते, त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करणे हास्यास्पद आहे. इराण-इस्रायल वादावर सल्ले देण्यापेक्षा राऊतांनी आधी आपल्या पक्षाची ढासळती अवस्था सुधारावी. राऊत तुम्ही सोनिया गांधी आणि शरद पवारांची कठपुतळी म्हणून तुम्ही वागत आहात. काँग्रेसची गुलामगिरी करणे थांबवा कॉंग्रेसवर टीका करताना बन म्हणाले की, देशाला गुलामगिरीच्या खाईत लोटण्याचे काम काँग्रेसने केले आहे. आज संजय राऊत त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. भाजप सरकारने देशाला स्वाभिमान दिला असून, आज भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. राऊत सध्या काँग्रेसची गुलामगिरी करत आहेत, त्यांनी स्वतःचा स्वाभिमान शोधावा. गाढव नाक्यावरून सल्ला देणे बंद करा संजय राऊत स्वतःला आंतरराष्ट्रीय अभ्यासक समजून रोज सकाळी उठून पंतप्रधान मोदींना सल्ले देण्याचा ‘धंदा’ करत आहेत. यावर भाष्य करताना बन म्हणाले की, राऊतांना जर युद्धनीतीचा इतकाच अभ्यास असेल, तर त्यांनी गाझा किंवा इराण-इस्रायल सीमेवर जाऊन परिस्थिती सांभाळावी. भांडूपच्या गाढव नाक्यावर बसून देशहिताच्या गप्पा मारणे बंद करावे. मोदींच्या नेतृत्वावर १४० कोटी जनतेचा विश्वास आहे आणि ते अत्यंत सक्षमपणे देशाचे धोरण ठरवत आहेत. म्हणून जनतेने नाकारले संजय राऊत यांच्या विधानांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. राऊत खालच्या भाषेत टीका करत असल्यामुळेच जनतेने त्यांना आतापर्यंत तीन वेळा नाकारले आहे. त्यांनी ही खालच्या पातळीची टीका थांबवावी, अन्यथा त्याचे परिणाम आगामी निवडणुकीत भोगावे लागतील, असा इशाराही नवनाथ बन यांनी दिला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर