ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

कॉंग्रेसमध्ये ‘प्रदेशाध्यक्ष हटाव’ची मागणी!:हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गट तयार, दिल्ली हायकमांडची घेणार 8 जूनला भेट

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आता विकोपाला गेली असून, हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचण्याची चिन्हे आहेत. विद्यमान प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात मोठी आघाडी उघडण्यास सुरुवात केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील नाराज नेत्यांचा एक मोठा गट येत्या 8 जून रोजी दिल्लीत जाऊन थेट काँग्रेस हायकमांडची भेट घेणार असून, पक्षश्रेष्ठींसमोर ‘प्रदेशाध्यक्ष बदला’ अशी मागणी ते लावून धरणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर नाराज असलेला राज्यातील काँग्रेस नेत्यांचा गट 8 जून रोजी नवी दिल्लीत धडकणार असून, ते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत. या विशेष शिष्टमंडळात राज्याच्या काँग्रेसमधील 4 ते 5 विद्यमान आमदार आणि अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर आली असून, नाराजांच्या या थेट दिल्ली दौऱ्यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अंतर्गत वादाचे कारण- संघटन सृजन अभियान काँग्रेसमधील या अंतर्गत वादाचे मुख्य कारण नुकतेच पक्षात राबवण्यात आलेले संघटन सृजन अभियान असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यभरात नवीन शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, या अत्यंत महत्त्वाच्या निवडी करताना स्थानिक नेते आणि ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले गेले नसल्याचा गंभीर आरोप नाराज गटाकडून केला जात आहे. या प्रक्रियेत चुकीच्या पद्धतींचा मनमानीपणे अवलंब झाल्यामुळे पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये मोठी खदखद निर्माण झाली आहे. कॉंग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार याकडे असणार लक्ष वरवर पाहता काही मोजकेच पदाधिकारी ही मोहीम उघडपणे चालवत असल्याचे दिसत असले, तरी या ‘प्रदेशाध्यक्ष हटाव’ मोहिमेला राज्यातील काही अत्यंत वजनदार आणि बड्या काँग्रेस नेत्यांचे छुपे बळ असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. ऐन विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधील ही संघटनात्मक धुसफूस चव्हाट्यावर आल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. आता येत्या 8 जून रोजी होणाऱ्या दिल्लीतील बैठकीत काँग्रेस पक्षश्रेष्ठी या नाराजीवर काय तोडगा काढतात आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भवितव्याबाबत काय मोठा निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर