ब्रेकिंग न्यूज
⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे
SP News Maregaon

वसंत मोरेंवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल:पत्रकार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्य भोवले, काय आहे नेमके प्रकरण?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शिवसेना ठाकरे गटाचे नेते व पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वनाथ रुकारां लहाडे (72) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मोरे यांच्यावर हा गुन्हा शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. एका पत्रकार परिषदेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. वसंत मोरे यांनी 25 फेब्रुवारी रोजी पुणे महापालिकेत पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वक्तव्ये केल्याचा आरोप आहे. फिर्यादी लहाडे यांचे म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतुपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले असल्याचे म्हणणे आहे. फिर्यादी लहाडे यांनी दिलेलया तक्रारीनुसार, वसंत मोरे यांनी “लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते. ओढ्यात उतरून गटारे साफ करत आहे,” असे विधान केले. तसेच हे वक्तव्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. या व्हिडिओमुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे. सध्या कुटुंबीय भीतीच्या आणि तणावाच्या वातावरणात असल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल वसंत मोरे यांच्याविरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 25 फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना मोरे यांनी माजी ठेकेदार विश्वनाथ लहाडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ही कारवाई केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर