ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

काँग्रेस भवन आंदोलनाप्रकरणी भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल:परस्परविरोधी तक्रारीनंतर शिवाजीनगर पोलिसांकडून कारवाई

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील काँग्रेस भवन येथे रविवारी भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या झटापट आणि दगडफेकीप्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपने हे आंदोलन केले होते. आंदोलनादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात झटापट होऊन दगडफेक झाली. या घटनेत काँग्रेसचे तीन, भाजपचे दोन, असे एकूण पाच कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. तसेच, दोन पोलिस कर्मचारी आणि दोन पत्रकारही किरकोळ जखमी झाले. या घटनेनंतर रात्री उशिरा काँग्रेसच्या कार्यकर्त्या प्राची नितीन दुधाणे (वय 42, रा. दुधाणेनगर, कर्वेनगर) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चाचे पदाधिकारी दुष्यंत मोहोळ यांच्यासह 50 ते 60 कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमर काळंगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, भाजपचे पदाधिकारी पुनीत श्रीकांत जोशी (वय 35, रा. आयडियल कॉलनी, कोथरूड) यांनीही काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध परस्परविरोधी तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, काँग्रेसचे पदाधिकारी अरविंद शिंदे, गौरव बाळंदे, अक्षय जैन, सागर धाडवे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय पांढरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर