ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

संभाजीनगरात विश्वासघाताचा कळस!:प्लॉटिंगमधील रस्ता विकून 2.89 कोटींची फसवणूक; सातबारा दाखवून स्टॅम्प ड्युटी भरत केली विक्री

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


आधीच प्लॉटिंग झालेल्या जागेतील रस्त्याच्या जागेचा‎७/१२ दाखवून त्याचा खरेदीखत, स्टॅम्प ड्यूटी भरून‎विक्री केली. मात्र मूळ जागा मालकाने सर्व कागदपत्रे‎समोर मांडल्यावर हा फसवणुकीचा प्रकार समोर‎आला. यात भाजपच्या बीड येथील शहराध्यक्ष अशोक‎चांदमल लोढा (६१, रा. गणेश हाउसिंग सोसायटी,‎जालना रोड, जि. बीड) यांची २ कोटी ८९ लाख ८९‎हजार ४२० रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी‎सातारा पोलिस ठाण्यात मंजिरी आलोक चौधरी, स्वप्ना‎विद्याधर बडीगणवार, मोहिनी दिलबागसिंग, जावेद‎नूरखाँ पठाण, सुरेश सीताराम इंगळे, बद्रीनारायण‎नागोराव करे, साहेबराव कचरू घुगे, बाबुराव‎आनंदराव ताठे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.‎ लोढा यांच्या तक्रारीनुसार, २०२३ मध्ये सातारा‎परिसरातील गट नंबर २० मधील १०३.५५ आर जमीन‎विक्री होत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांची‎आरोपींशी भेट झाली. त्यांच्यात ११ जुलै २०२३ रोजी‎नोटरीद्वारे करार झाला. यात प्रतिएकर २ कोटी ४० लाख‎रुपये प्रमाणे खरेदी करण्याचे ठरवले होते. त्यानुसार २०‎जुलै रोजी आरोपींनी मैत्रेय प्लॉटिंग सेंटर या फर्मच्या‎नावाने इसार पावती करून दिली. त्यावेळी एकूण ५०‎लाख रुपये देऊन १० लाख रुपये मोजणीसाठी दिले होते.‎ तीन वेगवेगळे खरेदीखत करत‎३५.५४ लाख स्टॅम्प ड्यूटी भरली‎ लोढा यांनी १८ एप्रिल २०२४ रोजी आठही‎आरोपींच्या ताब्यात असलेल्या मौजे‎साताऱ्यातील जमिनीचे तीन वेगवेगळे‎खरेदीखत करण्यात आले. यात ३३.५५ आर, ३५‎आर व ३५ आर असे भाग करण्यात आले होते.‎यासाठी एकूण १ कोटी ६१ लाख ०९ हजार ७२०‎रुपये चेकच्या माध्यमातून देण्यात आले होते.‎तसेच स्टॅम्प ड्यूटीसाठी ३५ लाख ५४ हजार‎७०० रुपये व दस्तऐवज शुल्क २५ हजार‎रुपयेदेखील भरण्यात आले.‎ तार कुंपण करताच मूळ‎मालकाने केले उद्ध्वस्त‎ खरेदीखत पूर्ण झालेले असल्याने आता तुम्ही‎जमिनीचा ताबा घेऊ शकता असे आरोपींनी‎सांगितले. त्यामुळे १५ लाख खर्च करून संपूर्ण‎जमिनीचे सपाटीकरण करून त्याच्याभोवती‎वॉल कंपाउंड करण्यात आले. त्यानंतर २६ मार्च‎२०२५ रोजी जमिनीचे मूळ मालक राजीव‎खेडकर यांनी व त्यांचा वॉचमन पवन दिलीप‎सोनवणे यांनी जमिनीवरील पत्र्याची रूम पाडून‎टाकली. तसेच फिर्यादीने ठेवलेल्या ‎वॉचमनलाही हाकलून लावले.‎ प्रकार उघडकीस आल्यावर दुसऱ्याला विकण्याची ऑफर‎ संबंधित जमीन खेडकर यांनी १९८४ सालीच‎खरेदी केली असल्याचे समोर आले. याची‎पूर्ण शहानिशा केल्यावर लोढा यांनी‎आरोपींना याचा जाब विचारला. त्यावर‎त्यांनीच घोटाळा केला असावा अशी शंका‎निर्माण केली.‎ तुमचे पैसे परत करण्यासाठी आता जमीन‎तिसऱ्या माणसाला विक्री करून देण्याची‎ऑफरदेखील फिर्यादीला आरोपींच्या वतीने ‎देण्यात आली आहे.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर