ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नाशिकमधील डॉ. मनीषा जेजुरकर आत्महत्या प्रकरण:दीड वर्षांपासून सुरू होता मानसिक जाच, पतीच्या विवाहबाह्य संबंधातून छळाचा कुटुंबीयांचा आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक शहरातील नामांकित आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या आत्महत्येने नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शुक्रवारी, 6 मार्च रोजी सकाळी 11:30 च्या सुमारास त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. मात्र, या धक्कादायक घटनेला आता वेगळे वळण मिळाले असून, त्यांच्या कुटुंबीयांनी डॉ. मनीषा यांच्या पतीवर, डॉ. नीलेश जेजुरकर यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले आहेत. एनडीटीव्ही मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, डॉ. मनीषा यांच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत खळबळजनक दावे केले आहेत. नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नीलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय मनीषा यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. याच कारणावरून गेल्या दीड वर्षांपासून मनीषा यांना प्रचंड मानसिक त्रास आणि छळ सहन करावा लागत होता, असा आरोप त्यांच्या भावाने केला आहे. नैराश्यातून पाऊल उचलले असावे सततच्या मानसिक त्रासामुळे मनीषा जेजुरकर मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्या होत्या आणि याच नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा दावा कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी गंगापूर पोलिस ठाण्यात धाव घेत डॉ. नीलेश जेजुरकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी लावून धरली आहे. सध्या गंगापूर पोलिस या घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत असून, शवविच्छेदन अहवाल आणि कुटुंबीयांचे जबाब यानंतर कारवाईची दिशा स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून तपास सुरू मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनीषा जेजुरकर या गंगापूर रोड परिसरातील रेवती ब्ल्यू अपार्टमेंट, डी. के. नगर येथे कुटुंबासह राहत होत्या. शुक्रवारी (6 मार्च 2026) सकाळी सुमारे 11.30 वाजता त्यांनी घरातील खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठाण्याचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिक आणि परिचितांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात शोकाचे वातावरण या घटनेमुळे नाशिक शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी, परिचित तसेच त्यांच्या रुग्णांकडून शोक व्यक्त केला जात आहे. अनेकांनी त्यांच्या सेवाभावी वृत्तीची आणि रुग्णांप्रती असलेल्या बांधिलकीची आठवण काढली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात शोकाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर