ब्रेकिंग न्यूज
⚡ वाद होताच दोस्ती विसरला, पुण्यात तरुणाने थेट मित्राच्या अंगावर फेकलं ॲसिड, चिमुकलीसह 4 जणांना भाजलं ✦ ⚡ सासरच्यांकडून त्रास, पतीनंही दिली साथ; विवाहितेचं टोकाचं पाऊल, पाच दिवस मृत्यूशी झुंज अन्… ✦ ⚡ Diwali 2026: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुनी का पूजतात? शास्त्र काय सांगतं? महत्त्व आणि परंपरा, Video ✦ ⚡ दिवाळीला सोलापूरच्या शेकऱ्यावर संकट, 4 एकर ऊस डोळ्यांदेखत जळून झाला खाक, लाखोंचं नुकसान ✦ ⚡ तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं? ✦ ⚡ MPSC Exam : अर्ज कसा करायचा? किती मुदतवाढ? परीक्षेच्या तारखेतही बदल, MPSC परीक्षेसंर्भात A to Z माहिती ✦ ⚡ दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मारेगाव पोलिसांचा ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर बडगा; धडक मोहीम सुरू! ✦ ⚡ IND vs NZ 2nd ODI : पावसाची रिमझिम पण टॉस जिंकून टीम इंडियाची बॉलिंग, सिराजला ‘नो एन्ट्री’, पाहा दोन्ही संघ… ✦ ⚡ Success Story : शेतात लावली 350 झाडी, सोलापूरच्या शेतकऱ्याला 7 लाख निव्वळ नफा, असं काय केलं? ✦ ⚡ पाच मुलांचा बाप, विधवा महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नको ते केलं अन् शेवट भयंकर, छ. संभाजीनगरच्या घटनेनं…
SP News Maregaon

तक्रार द्यायला आलेली महिला, पोलिसानं तिथंच ओळख काढली, साताऱ्यात थेट निलंबनाची कारवाई, काय घडलं?

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सातारा: कामानिमित्त पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेसोबत ओळख वाढवून एका पोलिसानंच तिच्या वैवाहिक परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. साताऱ्यातील पुसेगाव येथून हा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी थेट कारवाई करत पोलिसाला निलंबित केलं आहे. अमोल अशोक लोखंडे असं निलंबित पोलिसाचे नाव असून या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला तिच्या कामासाठी पुसेगाव पोलीस ठाण्यात आली होती. तेव्हा तिथे कार्यरत असणारा पोलीस अमोल लोखंडे याने त्या महिलेची ओळख काढली. पुढे महिलेसोबत ओळख वाढवून तिच्या वैवाहिक स्थितीबाबत सहानुभूती दाखवत जवळीक वाढवली. स्वत:च्या वैवाहिक स्थितीची माहिती न देता महिलेला विवाहाचं आश्वासन देत तिच्यासोबत शारीरिक जवळीक साधली.

Pune Crime: पुण्यात पोत्यात आढळले पुरुषाचे दोन कापलेले पाय; सिमकार्डच्या कव्हरमुळे सापडला धागा, मित्राचं घर गाठताच दुर्गंधी अन्…

संबंधित महिलेला लोखंडे याचा विवाह अगोदर झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिने थेट पोलिसांत धाव घेतली. प्राथमिक चौकशीनंतर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी अमोल लोखंडे याला तत्काळ निलंबित केले.

दरम्यान, पोलीस विभागात शिस्त, प्रामाणिकपणा, सचोटी, नैतिकता आणि जबाबदार वर्तणाला महत्त्व आहे. मात्र, कायद्याचे रक्षक म्हणूनच काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:च्या वर्तनाने पोलीस दलाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवणारे कृत्य केले. संबंधिताचे वर्तन शासकीय सेवकास अपेक्षित नसल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर