ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई, 4.27 कोटींचा मुद्देमाल जप्त:आंतरराज्यीय एमडी तस्करी टोळीचा पर्दाफाश, सहा आरोपी अटकेत

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे शहर पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. राजस्थानमध्ये धडक छापे टाकून पोलिसांनी आंतरराज्यीय एमडी (मेफेड्रॉन) तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एकूण 1 किलो 960 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले असून, सुमारे 4 कोटी 27 लाख 9 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईची सुरुवात 3 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे झाली. खराडी येथील ईऑन फेज-2 मागील गेटजवळ दोन संशयित इसम पांढऱ्या स्वीफ्ट कारमधून 27 ग्रॅम मेफेड्रॉनसह आढळून आले. त्यांच्या ताब्यातून 12 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी खराडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी मोतीसिंह राजपुरोहित आणि हरीष रामदेवासी हे मूळचे राजस्थानमधील असल्याचे निष्पन्न झाले. गेल्या वर्षभरापासून ते राजस्थानमधील त्यांच्या संपर्कांद्वारे पुण्यात एमडीची विक्री करत असल्याची कबुली त्यांनी दिली. पुढील तपासात, योगेश ऊर्फ मनीष बिष्णोई याला वाघोली परिसरातून अटक करण्यात आली. त्याच्याकडून 151 ग्रॅम एमडी आणि मोबाईल असा 30 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर सचिन ऊर्फ एसके बिष्णोई याला हडपसर-मुंढवा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 4 लाख 65 हजार रुपये रोख आणि मोबाईल जप्त करण्यात आला. याशिवाय, मांजरी बुद्रुक येथील अमित घुले याला त्याच्या फॉर्च्युनर वाहनासह अटक करण्यात आली. त्याच्याकडून 398 ग्रॅम एमडी, दोन मोबाईल आणि वाहनासह 1 कोटी 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त झाला. या आंतरराज्यीय रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उप आयुक्त सोमय मुंडे आणि गुन्हे शाखेचे उप आयुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच तपास पथके राजस्थानला रवाना करण्यात आली. नुकतेच बालोतरा येथे रतनलाल जाठ याला अटक करून त्याच्याकडून 1 किलो 384 ग्रॅम एमडी, ज्याची किंमत सुमारे 2 कोटी 76 लाख 80 हजार रुपये आहे, जप्त करण्यात आले. तसेच, या प्रकरणात फरार असलेला आरोपी रामकरण जाट यालाही ताब्यात घेण्यात आले. या एकत्रित कारवाईत 3 कोटी 92 लाख रुपयांचे अंमली पदार्थ आणि 35 लाख 9 हजार रुपयांची वाहने व इतर साहित्य असा एकूण 4 कोटी 27 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुणे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे एमडी रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर